महाराष्ट्र
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो .97 30 867 448
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवामृत भवन, सदाशिवनगर येथे भव्य "रक्तदान शिबिराचे" आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कै.सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील (काकासाहेब) व कै. रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते पाटील (अक्कासाहेब ) यांच्या प्रतिमेचे पूजन करून व शिबिराचे उदघाटन विधानसभा आमदार राम सातपुते यांचे शुभहस्ते करण्यात आले तसेच याप्रसंगी माजी जि प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, जि प सदस्या स्वरूपाराणी मोहिते पाटील, अरुण तोडकर, जि प सदस्या सुनंदा फुले, मंगलताई वाघमोडे, सुनंदा फुले, संगीताताई मोटे, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, प्रतापराव पाटील, शंकरराव भानवसे, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, RPI चे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, नगराध्यक्ष डॉ आप्पासाहेब देशमुख, तालुकाध्यक्ष नरेंद्र भोसले, भिलारे भाऊ, ऍड. बी वाय राऊत, गणपतराव वाघमोडे, पं स सदस्य माऊली पाटील, संदीप सावंत, सुभाष कुचेकर, सावता ढोपे, बाळासाहेब होले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब रूपनवर, संदीप पाटील, शिवामृतचे संचालक अरविंद भोसले, लक्ष्मण पवार, शरद साळुंखे, अनंतलाल दोशी, माऊली सूळ, नारायण सालगुडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, सहकार महर्षी कारखान्याचे संचालक, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पुरंदावडे चे अधिकारी सोनाली परतवार व सर्व स्टाफ, तसेच अक्षय ब्लॅक बँक चे चेअरमन संजयकुमार शिंदे व सर्व स्टाफ, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँक अकलूज चे सर्व स्टाफ, तसेच यावेळी शिवरत्न वेलफेअर ट्रस्ट, माजी जि प सदस्य, माजी पं स सदस्य, श्री शंकर सहकारी कारखान्याचे संचालक, सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

विशेषता या अनुषंगाने पर्यावरणाचा वाढता ऱ्हास रोखण्यासाठी वृक्षलागवड व्हावी म्हणून प्रत्येक रक्तदात्यास एक वृक्ष भेट देण्यात आले तसेच विजयदादांच्या संकल्पनेतून श्री शंकर सहकारी चे चेअरमन तथा विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वांना स्वच्छ फिल्टर चे पाणी मिळावे म्हणून कारखाना कार्यस्थळी ऍरो प्लॅन्ट उभारून मोफत पाण्याची सोय उपलब्ध करून दिली व आज प्रत्येक रक्तदात्यांस जार वाटप करण्यात आले, आदरणीय विजय दादांच्या आवडीचे सामाजिक, पर्यावरण व आरोग्य विषय उपक्रम राबवून एक अनोखा आदर्श निर्माण केला. या रक्तदान शिबिरात २७९ रक्तदात्यांनी आपले बहुमोल रक्तदान केले




