शहर

भर दिवसा सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या पोलीस ठाणे हद्दीत चोरी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640

पालघर जिल्ह्यातील सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड इन्चार्ज असलेल्या केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील जोगाळे येथील योगेश घरत यांच्या घरात भर दिवसा चोरी करून दोन मोबाईल चोरी करून पळून जाण्यासाठी घर मालकाच्या गाडीचा वापर करून हे चोर फरार झाले आहेत.

पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील जोगाळे रस्त्यावर योगेश महेश घरत, दीपेश महेश घरत, प्रफुल्ल महेश करत असे तीन भाऊ एकत्र कुटुंबात राहतात शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी साडेबारा वाजता घरातील सर्वजण जोगाळे गावात गौरी गणपतीच्या आरतीसाठी गेले असताना

त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी भर दिवसा उघडून अज्ञात चोरांनी त्यांच्या घरातील वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरी करून पलायन केले आहे.हे मोबाईल चोरी करून घेऊन जात असताना जाण्यासाठी त्यांनी त्यांच्या घरातील दुचाकीचा वापर करून ही दुचाकी केळवा रोड रेल्वे स्टेशन जवळ लावारिस पणे सोडून दिली होती.

तसेच हे चोर चोरलेल्या मोबाईलवरून या कुटुंबीयांना घरच्या मोबाईलवर फोन करून पैशांची मागणी करत आहेत. या बाबत घरत कुटुंबीयांनी केळवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button