महाराष्ट्र

दिल्लीचे तख्त विरूद्ध महाराष्ट्राची अस्मितेची लढाई असून दिल्लीत काय होणार हे महाराष्ट्र ठरवणार – महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल -8378076123

महाराष्ट्रात काय होणार हे दिल्ली ठरवणार नसून महाराष्ट्रात काय होणार हे स्वाभिमानी महाराष्ट्र ठरवणार आहे. सध्याची लढाई ही भाजपा विरूद्ध महाविकास आघाडी नसून दिल्लीचे तख्त विरूद्ध महाराष्ट्राची अस्मितेची लढाई असे असल्याचे प्रतिपादन महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

पिंपरी बुद्रुक येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरात गावभेट दौरा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तूत्ववानांचा सन्मान प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, प्रशांत पाटील, प्रताप पाटील, श्रीमंत ढोले, हनुमंत कोकाटे, सचिन सपकाळ, सुरेश शिंदे, सागर मिसाळ, श्रीकांत बोडके, दादासाहेब क्षिरसागर, संग्रामसिंह पाटील, दत्तात्रय घोगरे, सरपंच ज्योती बोडके, उपसरपंच पांडुरंग बोडके, रेहाना मुलाणी, सुदर्शन बोडके, दत्तात्रय शेंडगे आदि मान्यवरांसह महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, आपण कर्तूत्ववान, खरे, स्वाभिमानी असून गद्दार व मिंधे नाही आहोत. सध्याचे राज्याचे व देशाचे वातावरण दुषित असून या राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आता आली आहे. आपण जो मोकळा स्वास घेतोय तो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने दिलेल्या अधिकार असून केंद्र सरकार तो हिसकावून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे.

बहोत हो गई महंगाईकी मार अब की बार महाविकास आघाडी सरकार. महागाई, बेरोजगारी कमी करण्यासाठी आपल्याला आता बदल करावाच लागेल. एकीकडे केंद्र सरकार बेटी बचाव, बेटी पढाव म्हणते आहे. तर नविन संसदेच्या उद्घाटनप्रसंगी लेक पोलीसांच्या काठीचा मार खात होती हे पाप आहे. मी क्रुर केंद्र सरकारच्या ह्या गोष्टीचा जाहीर निषेध व्यक्त करते. केंद्रीय मंत्र्यांना इंदापूरला एक हजार किलोमीटर अंतरावर यायला जमते परंतू १०० मिटरवर असणाऱ्या लेकीला भेटायला जायला वेळ नाही. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी या गद्दारांना दोन हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. यासर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून आपले हित जपणारे व विकास करणाऱ्यांना मतदान करा असे शेवटी आवाहन केले.

माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलताना म्हणाले, खासदार व आमदाराचे नाणे खणखणीत असून खरे बोलणाऱ्यांना डोक्यात ठेवण्याची गरज भासत नाही. तर जो लबाड व खोटारडा असतो त्याला सर्वच गोष्टी कायम डोक्यात ठेवावे लागतात. पिंपरी बुद्रुक गावाची आठवण ही बोडके दादांच्या कामामुळे कायम स्मरणात राहणारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्वचजण काम करत आहेत.

यावेळी श्रीकांत बोडके यांची अकलूज कारखान्याच्या संचालकपदी निवडीबद्दल, मुख्याध्यापक दिलीप पाडूळे यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती निमित्त, तोहिद शेख यांची मुंबई पोलीसमध्ये निवड झाली, सुहानी पडळकर सिबीएस्सीत ९६% गुण मिळवलेबद्दल, रोशनी बोडके यांनी कुस्तीत चमकदार कामगिरी, तर १०५ महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वाटप खासदार सुप्रिया सुळे व आमदार दत्तात्रय भरणे यांचे हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत बोडके यांनी, सुत्रसंचलन महेश सुतार यांनी आभार बाळासाहेब घाडगे यांनी मानले. अशोक बोडके, शशिकांत सुर्यवंशी, केशव बोडके, समाधान बोडके आदि मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button