खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते सफाळे रेल्वे स्थानकात सरकत्या जिन्याचा लोकार्पण सोहळा संपन्न

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत
पालघर जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकावरील सरकत्या जिन्याचा लोकार्पण सोहळा खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते गुरुवार दिनांक 13 जुलै 2023 रोजी पार पडला.
यावेळी खासदार राजेंद्र गावित यांनी सफाळे रेल्वे स्थानकावरील रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 ची पाहणी केली यावेळी त्यांनी पूर्वेकडील असलेला पब्लिक ब्रिज लांब पल्याचा व नागमोडी स्वरूपाचा असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक व प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर पूर्वेकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी सफाळे पूर्व मार्केट रिक्षा स्टॅन्ड जवळ जिन्याची व्यवस्था करून द्यावी तसेच सफाळे पश्चिमेला असलेले अर्धवेळ चालणारे तिकीट कार्यालय प्रवाशांसाठी पूर्णवेळ चालू करण्यात यावे
यामुळे पश्चिमेकडील प्रवाशांना तिकीट काढून प्रवास करणे सोयीचे होईल तसेच सफाळे भागातील पूर्व आणि पश्चिम भागातील प्रवासी रेल्वे फाटकातून प्रवास करताना रेल्वे अपघात होतात हे रेल्वेअपघात होऊ नये म्हणून रेल्वे फाटका जवळ लवकरात लवकर ब्रिज उभारण्यात यावा अशा सूचना यावेळी खासदार राजेंद्र गावित यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या या सूचनांचे लवकरात लवकर पालन करून त्या अमलात आणण्यात येतील असे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी खासदार राजेंद्र गावित यांना दिले. यावेळी खासदार राजेंद्र गावित, केदार काळे पश्चिम रेल्वे डी.आर.यु.सी. सदस्य मुंबई सेंट्रल सफाळे रेल्वे स्टेशन प्रबंधक चुन्नीलाल अग्रेसर, सफाळे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, पोलीस नाईक कैलास शेळके, नितीन वर्तक, डी. एफ. सी.सी. अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच रेल्वे संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते



