पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान ; करमाळ्यात जल्लोष
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल करमाळ्यात भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. पंतप्रधान मोदींच्या शपथविधीसोबतच भाजपा व एनडीएमधील घटकपक्षातील ६३ सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
महाराष्ट्रातून नितीन गडकरी,मुरलीधर मोहोळ,पीयूष गोयल,रक्षा खडसे,प्रतापराव जाधव, रामदास आठवले यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे.पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी देशाच्या इतिहासात सलग तीन वेळा पंतप्रधान होण्याचा बहुमान काल मिळवला व देशात सलग तिसऱ्यांदा देशात भाजपा नेतृत्वाचे मोदी 3.O सरकार सत्तेत आले. यानिमित्त करमाळा येथे भाजपा कार्यकर्त्यांनी श्रीराम चौकात एकत्र जमून फटाके फोडले, बँजोच्या गजरात ठेका धरत एकमेकांना साखर आणि पेढे वाटून मोठ्या उत्सहात जल्लोष केला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पै.अफसर जाधव,तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अगरवाल, जेष्ठ नेते राधेश्याम देवी, महेश परदेशी, संजय आण्णा घोरपडे ,नाना मोरे,सोशल मीडिया प्रमुख नितीन झिंजाडे,अमोल पवार,जयंत काळे पाटील,गणेश माने, कपिल मंडलिक, आण्णा पडवळे, किरण शिंदे, सोमनाथ घाडगे, पत्रकार दिनेश मडके, आजिनाथ कोळेकर वस्ताद,
किरण बागल ,दिपक गायकवाड, विश्वजीत परदेशी, चरणसिंग परदेशी, वैभव आहेर, संजय जमदाडे, सचिन चव्हाण,मच्छिंद्र हाके, नवनाथ खाडे,
नितीन निकम, हर्षद गाडे, राम परदेशी, राजश्री खाडे, संगीता नष्टे,पूजा माने, जयश्री वाघमारे,
शरद कोकीळ,विनोद इंदलकर, महादेव गोसावी, संतोष जवकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.