सुमैय्या मुसाभाई बागवान यांनी पुणे ACP पदाचा प्रभार स्विकारला…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधि,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499
पंढरपूर येथील दिवंगत एच कोंडाजी इलाहीबक्ष बागवान यांची नात आणि सासवड येथील दिवंगत मुसाभाई महम्मदभाई बागवान यांची कंन्या असलेल्या सुमैय्या मुसाभाई बागवान यांची पुणे पोलिसांच्या गुप्तहेर शाखेच्या ACP पदी निवड झाल्याची माहिती सासवड नगर पालिकेचे मा नगरसेवक हारूनभाई बागवान यांनी टाइम्स 9 न्युज चे पत्रकार आमीर मोहोळकर यांच्याशी भ्रमणध्वनी वरून बोलताना दिली…
पुढे बोलताना ते असे हि म्हणाले की, सोलापूर, मुंबई, ठाणे,लोणावळा येथे पोलिस अधिकारी म्हणून सेवा बजावल्यानंतर सुमैय्या बागवान यांची पुणे येथे पदोन्नती होत गुप्तहेर शाखेच्या ACP पदी झालेली निवड हि त्या सार्थ ठरवतील…
सुमैय्या बागवान यांची पुणे ACP पदी झालेल्या निवडीने समस्त बागवान समाजाची मान उंचावली असुन महाराष्ट्र बागवान समाजाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले…
ACP सुमैय्या बागवान ह्या सासवड चे दिवंगत माजी उपनगराध्यक्ष खाजाभाई बागवान यांची पुतणी आहेत…सुमैय्या बागवान यांच्या झालेल्या पदोन्नती ने पंढरपूर शहर बागवान समाजाने हि आनंद व्यक्त करत त्यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या…