महाराष्ट्र

विजेचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पाच वर्षात किमान दहा नवीन उप वीजकेंद्र होणे गरजेचे होते, विजेच्या प्रश्नाची हेळसांड झाल्याचा माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा आरोप

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

वीजेचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पाच वर्षात किमान दहा नवीन उपवीज केंद्र कार्यान्वीत व्हायला हवी होती, वीजेच्या प्रश्नाची हेळसांड झाल्याचा आरोप माजी आमदार नारायण पाटील यांनी केला. मलवडी येथील आयोजित सभेत ते बोलत होते. जनसंवाद गावभेट दौऱ्यात मलवडी येथील सभेच्या अध्यक्षस्थानी…होते. तर व्यासपीठावर सभापती अतूल पाटील, उपसभापती दत्तात्रय सरडे, प्रा. अर्जूनराव सरक आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की सन २०१४ ते २०१९ दरम्यान ९ नवीन उपवीज केंद्रांची उभारणी झाली. तसेच १३ ठिकाणी पाच एम व्ही फिडर बसवून क्षमतावाढ केली. करमाळा तालुक्यातील पुर्व भागातही आता वीजेची मागणी जादा प्रमाणात आहे. तर उजनीकाठच्या गावांमध्येही वीजपुरवठा व मागणी यांचे गणित जुळले नाही. सन २०१९ ते आजतागायत वाढीव सबस्टेशन होणे गरजेचे होते. कमी दाबाने वीज मिळाली अथवा कमी प्रमाणात वीजपुरवठा झाला तरी याचा थेट परिणाम पिक उत्पादनावर होतो.

यामुळे हि समस्या कायमची सोडवण्यासाठी आमच्याकडे योग्य नियोजन आराखडा आहे. आगामी निवडणुकीत जनता जनार्दनाने संधी दिल्यास वीज प्रश्नावर काम करुन यासाठी शासनाकडून विशेष निधी खेचून आणण्याची धमक आपल्यात असल्याचा आत्मविश्वास माजी आमदार नारायण पाटील यांनी बोलून दाखवला. यावेळी उत्पल भोसले, बाळासाहेब जाधव, चंद्रसेन पालवे, पै. बिनू कोंडलकर, सुरेश धेंडे, सतीश पन्हाळकर, कांतीलाल पालवे, शरद पालवे, कांतीलाल धेंडे, प्रवीण पालवे, नवनाथ सुरवसे, पांडुरंग बादल, भाऊसाहेब भांडार, शिवाजी जाधव, विठ्ठल भोसले, प्रवीण म्हत्रे, बाप्पा लवळे, दशरथ लवळे, शंकर पन्हाळकर, पिंटू सुरवसे, दिलीप काळे, भिवा कोंडलकर, दत्तात्रय पालवे, त्रिंबक कोळी, बाबू कोकरे, सतीश कोंडलकर, सुभाष देवकते, नितीन पालवे, गोरख पन्हाळकर, दादा कोळी आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button