विद्यार्थ्यांनो ध्येयवेडे व्हा..मदनसिंह मोहिते पाटील
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्यांनी शिस्तप्रिय रहावे. अध्ययनशील बनून मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करून देशाचे नाव मोठे करावे असे प्रतिपादन माजी सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील यांनी केले. ताहेरा फाउंडेशन अकलूज आयोजीत गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभात मदनदादा कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबुबकरभाई तांबोळी यांनी विविध उपक्रमाबद्दल माहिती देत सर्वांचे अभिनंदन करत सहकार्या बद्दल आभार व्यक्त केले.आणखीन चांगल्या कामाचा मानस हाजी अबुबकरभाई यांनी व्यक्त केला.
सदर कार्यक्रमात नीट परीक्षेत विशेष यश मिळवणारा मोईन तांबोळी याचा विशेष सत्कार मदनदादा यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी मोईनने ताहेरा फाउंडेशन कडून दिलेला लॅपटॉप आणी आर्थिक सहकार्याबद्दल आभार मानत विद्यार्थ्यांना अभ्यासात कष्ट करण्याचे आवाहन केले.
गुणवंत विद्यार्थीना मदनदादा व इतर मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य ठेवण्यासाठी सॅक व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.दहावीच्या पंधरा तर बारावीच्या चौदा विद्यार्थ्यांना कार्यक्रमात गौरवण्यात आले.
विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना रुकैया बागवान हिने पालकांना मुलींच्या शिक्षणाविषयी आग्रह धरला. मुलगा वंशाचा दिवा असला तर मुलगी समई असल्याचे रुकैया बागवान हिने सांगितले. मान्यवर पाहुण्यांतून बोलताना पांडुरंगराव देशमुख यांनी ताहेरा फाउंडेशनच्या विविध कार्यक्रमाचे कौतुक केले. मोईन तांबोळी याचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमासाठी किशोरसिंह माने-पाटील, युसूफभाई तांबोळी, प्रा. अबुबकर शेख ,ॲड. वजीर शेख, शादाब तांबोळी, नाजीम खान, रफीक तांबोळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन प्रा. तैयब खान यांनी विशेष शैलीत करत कार्यक्रमाला रंगत आणली.
गुणवंत विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमांबद्दल ताहेरा फाउंडेशन यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त केले. तर गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवरील शाबासकीच्या थापमुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यात कष्टाचे वेगळे समाधान दिसत होते.सदर कार्यक्रमांबद्दल ताहेरा फाउंडेशनचे परिसरात कौतुक होत आहे.