महाराष्ट्र

तस्मिया बानो आणि आदिल साहब यांचा साखरपुडा थाटामाटात संपन्न…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499

अकलूज चे प्रसिद्ध उद्योगपती आणि हॉटेल व्यावसायिक हाजी जहांगीरभाई अमीरहमजा बागवान (चौधरी) यांची नात आणि मुस्लिम समाजाचे नेते हाजी जमीरभाई हाजी जहांगीरभाई बागवान (चौधरी) यांची सुकन्या “तस्मिया बानो” याचा साखरपुडा पुणे येथील उद्योगपती हाजी युनुसभाई बागवान यांचे चि “आदिल साहब” यांच्या बरोबर अकलूज येथील “आनंदमुर्ती मल्टीफंक्शन हॉल” येथे रविवार दि 09/06/”24 रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला…

साखरपुड्या साठी आलेल्या सर्व आप्तेष्टांचे बागवान (चौधरी) परिवाराच्या वतीने शाल देऊन स्वागत करण्यात आले…

गोरज मुहूर्तावर संपन्न झालेल्या साखरपुड्या प्रसंगी भविष्यकाळातील या वधु वरांना शुभेच्छा आणि शुभ आशिर्वाद देण्यासाठी माढा लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ शितलदेवी मोहिते पाटील यांच्या सह अकलूज शहर बागवान जमातीचे सर्व सदस्य,व्यापारी,मित्र मंडळी,आणि पुणे,मिरज,सांगली,पंढरपूर,पाटस,कुर्डुवाडी, इच्चलकरंजी,वाई,वाळवा,सोलापूर येथील पाहुणे रावळे यांची उपस्थिती लक्षणीय होती…

सदर साखरपुड्या प्रसंगी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत माढा लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपले अत्यंत विश्वासू सहकारी हाजी जमीर चौधरी यांना भ्रमणध्वनी वरुन शुभेच्छा व्यक्त केल्या…

कार्यक्रमाच्या सुरुवातीस इंदापूर येथील शाही आचाऱ्याने बनवलेल्या मटन कुर्मा,चिकन बिर्याणी,रुमाली रोटी आणि फ्रूट सलार्ड वर आणि निवडक पाहुण्यांसाठी केलेल्या शाकाहारी जेवणावर यथेच्छ ताव मारण्यात आला…

या साखरपुड्या प्रसंगी अकलूज येथील बागबाने गुलशने रिसालत आणि “चांदतारा” फाउंडेशन च्या युवक कार्यकर्त्यांनी “काज तुम्हारा – खिदमत हमारी” हा संदेश देत आलेल्या सर्व पाहुण्यांची सरबराई केली…
कायम स्मरणात राहील असा “माशअल्लाह” असा साखरपुड्या चा कार्यक्रम झाल्याने आलेल्या प्रत्येक घटकाने बागवान (चौधरी) परिवारावर शुभेच्छा चा वर्षाव करत कौतुक केले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button