महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यात नवीन राजकीय पर्वाला सुरुवात…अकलूज चे युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील करणार नव्या अध्यायाची सुरूवात…

माढा विधानसभे साठी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या नावाला जनतेची सर्वात जास्त पसंती…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499

माढा लोकसभा मतदार संघातुन धैर्यशिल मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभा मतदार संघातुन प्रणिती शिंदे ह्या विजयी झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाची गणिते बदलली जाण्याची शक्यता निर्माण झाली असताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली की सोलापूर जिल्ह्याच्या सत्तेच केंद्र “अकलूज” च राहणार हे आता जवळ जवळ सिद्ध झाले आहे…

धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंड पुकारल्या नंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवल्या नंतर सोलापूर लोकसभेच्या काँग्रस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी हि “मिडास टच” देत माढा लोकसभा मतदार संघातून दणदणीत विजय मिळवला…

माढा लोकसभा मतदार संघातून धैर्यशिल मोहिते पाटील निवडून आल्याचा जितका आनंद जिल्हयातील जनतेने साजरा केला अगदी तितकाच आनंद राम सातपुते हे चारी मुंड्या चित झाल्यानंतर साजरा केला गेला हे विशेष…सोलापूर जिल्ह्यातील या दोन्हीं लोकसभेच्या जागा जेंव्हा महाविकास आघाडीने जिंकल्या तेंव्हा एक नवं राजकीय पर्व सुरु झालं ते अकलूज चे माजी सरपंच राहिलेले शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे…

वयाच्या 22 व्या वर्षी अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणुन आपल्या राजकीय जीवनाला सुरूवात करणाऱ्या शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी जनमानसात एक वेगळी इमेज निर्माण केली,शिवतेजसिंह मोहिते पाटील हे अल्पावधीतच अकलूज सह माळशिरस तालुक्यात आपले नेतृत्व सिध्द करत असताना लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली अन् एक नवीन अध्याय सुरू झाला असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही…

धैर्यशिल मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत लढत असताना माढा विधानसभा मतदार संघाची संपूर्ण जबाबदारी अकलूज चे माजी युवा सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या खांद्यावर येऊन पडली,माढा तालुक्याच्या आमदारांना त्यांच्याच तालुक्यात शह देत शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी आपले कर्तृत्व आणि नेतृत्व पुन्हा एकदा सिध्द करत धैर्यशिल मोहिते पाटील यांना निर्णायक मतांची आघाडी हि मिळवून दिली…

धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाच्या नेतृत्वाला दिलेला शह राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरला आणि इकडे शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी माढा चे आमदार शिंदे यांना दिलेला शह सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरला…

राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विषयीची जनतेच्या मनात असलेली सहानुभूती आणि मोहिते पाटील परिवाराची राजकारणातील “अचूकता” ह्या दोन गोष्टी धैर्यशिल मोहिते पाटील यांना “विजय श्री” बहाल करुन गेली तर इकडे शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी जिल्ह्याच नेतृत्व करण्यासाठी समर्थ असल्याची पोच पावती लोकसभा निवडणुक काळात जनते कडून मिळवली…

पुढील काही महिन्यांत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे त्या वेळी शरद पवार यांना माढा विधानसभा मतदार संघासाठी उमेदवार चाचपणी करण्याची गरजच भासणार नसण्याचे चित्र सध्या तरी निर्माण झाल्याचे दिसत असून,याचे कारण शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकी मध्ये “अजातशत्रू” ची भुमिका निभावत माढा तालुक्यातुन मिळवलेली मतांची आघाडी आणि त्याच बरोबर मिळवलेले जीवाभावाचे कार्यकर्ते ह्या जमेच्या बाजु ठरल्या…

माढा तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांचे हेच संघटन भविष्यात अजुन एक ऐतिहासीक कामगिरी पार पाडतील आणि गेली तीस वर्षे विकासापासून वंचित असलेल्या माढा विधानसभेला एक नवा आमदार शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या रूपात देतील हे मात्र तितकेच खरे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button