महाराष्ट्र

उजनी दुर्घटनेतील मयत कुटूंबियांना करमाळा माढा विधानसभा शिवसेना संपर्क प्रमुख रवि आमले यांच्याकडून आर्थिक मदतीचा हात

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

मागील महिन्यात उजनी धरणामध्ये वादळी वाऱ्याने बोट उलटून झालेल्या दुर्घटनेमध्ये झरे येथील जाधव दांपत्य व त्यांची 3 वर्षाची मुलगी व 2 वर्षाचा मुलगा असे एकाच कुटूंबातील चार व्यक्ती मयत झालेले होते. सदरच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हादरून गेला होता व या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली गेली होती.

करमाळा येथील व सद्यस्थितीत मुंबई येथे स्थायिक असलेले करमाळा माढा विधानसभा संपर्क प्रमुख रवि आमले यांना सदरची घटना समजलेनंतर त्यांनी मुंबईहून येवून करमाळयातील शिवसेनेच्या शिष्टमंडळासह सदर मयत कुटूंबातील सदस्यांची सांत्वनपर भेट घेत त्यांना धीर दिला तसेच मयत कुटूंबातील व्यक्तींना आर्थिक मदत केलेली आहे.

यावेळी आमले म्हणाले की, सदरची घटना अत्यंत दुर्दैवी घडलेली असून आम्ही व आमचा संपूर्ण शिवसेना पक्ष मयत कुटूंबाच्या पाठीशी ठामपणे उभा असून लवकरच महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मयत कुटूंबियांना आर्थिक मदत मिळवून देणार आहे. तसेच पुन्हा अशा घटना घडू नयेत व बेकायदेशीर जलवाहतूकीला आळा बसण्याकरिता यावर तात्काळ उपाययोजना करण्यासंदर्भात शासन स्तरावरून पाठपुरावा करणार आहे. त्याचप्रमाणे करमाळा तालुक्यापासून इंदापूर तालुक्याला जोडणारा नवीन पूल बांधण्यासाठी सुध्दा मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आमले यांनी सांगितले.

यावेळी करमाळा तालुक्याचे माजी संपर्क प्रमुख तथा बीड जिल्हा संपर्क प्रमुख बापू मोरे, शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड, युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, शिवसेना उप तालुका प्रमुख दादासाहेब तनपुरे, सुभाष पाटील, युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, कोल्हापूर येथील दक्षता समितीच्या सदस्या पद्मजा इंगवले, युवा सेना उप शहर प्रमुख अनिकेत यादव, गणेश पवार, खंडू जगताप आदी शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button