शहर

पर्यावरण दिनानिमित्त डहाणू शहर मंडळ (नगरपालिका) क्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रम

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डहाणू शहर मंडळ (नगरपालिका) क्षेत्रामध्ये वृक्षारोपणाचा विशेष उपक्रम गुरुवार दिनांक 5 जून रोजी राबवण्यात आला.
पर्यावरण संरक्षण आणि हरित क्षेत्र वाढवण्याच्या उद्देशाने डहाणू नगरपालिका डॅशिंग माजी नगराध्यक्ष तसेच भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम राबविण्यात आला.


या कार्यक्रमाद्वारे लोकांमध्ये पर्यावरण जागरूकता वाढवणे, प्रदूषण कमी करणे व हरित वातावरण निर्मिती करणे हा मुख्य उद्देश होता.

सदरच्या कार्यक्रमात डहाणू शहर मंडळ अध्यक्ष पिनल शहा, माजी नगर सेवक रमेश काकड, संदेश पाटील, श्रीकांत ठक्कर, प्रफुल्ल पाटील, डहाणू युवा मोर्चा अध्यक्ष राज पटेल, पालघर जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष दक्षेस पाटील, पालघर जिल्हा महिला उपाध्यक्षा श्रीमती सुजाता माळी, महिला मोर्चा अध्यक्षा श्रीमती रश्मी पांचाळ व इतर महिला व फयाज खान, राकेश सरवैया, मोईज शेख, जिग्निल पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button