महाराष्ट्र

वीज वितरण कंपनीच्या गलथान व भोंगळ्या कारभारामुळे कुंभेज ग्रामस्थांनी दिला उद्या कुंभेज फाटा येथे रास्ता रोको करण्याचा इशारा

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

कुंभेज तालुका करमाळा येथील ग्रामस्थांनी कमी दाबाने मिळणारी विज व दोन तास मिळणारी विज यांना वैतागून कुंभेज फाटा येथे शुक्रवारी सकाळी 12तारखेला रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.

कमी दाबाने मिळणारी विज यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.मुक्या जनावरांना पाणी मिळत नसल्यामुळे जनावरांचे हाल होत आहेत.विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.विजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार भेटून तक्रारी करण्यात आल्या होत्या .पण अधिकारी शेतकऱ्यांना टाळाटाळ करीत होते.त्यामुळे कुंभेज ग्रामस्थांनी विजवितरण घ्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

या रास्तारोको आंदोलनाचे निवेदन तहसील कार्यालय, पोलिस ठाण्यात,व जेऊर येथील MSEB कार्यालयात कुंभेज ग्रामपंचायत चे उपसरपंच संजय तोरमल, दत्तू शिंदे, चेअरमन युवराज भोसले, सोमनाथ माने ,सचिनसातव, इन्नुश पठाण,बिंटूतोरमल, अमोल मुटके सर , जयदीप शिंदे,किरण झोळ, आदी मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button