अनिल पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा…
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
डहाणू तालुक्यातील बाडा पोखरण ग्रामपंचायत तरुण तडफदार सदस्य अनिल पाटील यांच्या 40 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले…
कुलस्वामिनी महालक्ष्मी मातेचे दर्शन घेत अनिल पाटील यांनी दिवसाची सुरुवात आपल्या घराजवळ वृक्षारोपण करून केली…
शेजारी वसलेल्या अब्राहम शाळे मधील सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आणि खाऊ वाटप करण्यात आला, जवळच असलेल्या बहाड गावात काही दिवसा पासून रहास होत असलेल्या आंब्याच्या झाडाची पुनर्लागवड करून त्याच्या देखभालीची समस्या हि सोडवली…
तद्नंतर एसएससी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गावातील 35 विद्यार्थ्यांना भेट वस्तू देत गौरव करण्यात आला,या वेळी शालेय मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, हर्षल सर आणि गिरासे सर यांच्या उपस्थितीत शालेय ऑफिस साठी लागणारे टेबल हि देण्यात आले…
वारंवार तक्रार करून ही PWD च्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केलेल्या बोईसर ते डहाणू सागरी मार्गावर अनेक ठिकाणी नागमोडी वळणे आहेत तिथे पथ दर्शके बसवून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची सोय केली…
या वेळी बाडा पोखरण शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष वासुदेव राऊत,शाळा समिती चे सदस्य राकेश मडवे,नामदेव कडू,हेमंत मडवे,नरेंद्र मडवे,गणेश राऊत,सचिन पाटील,राकेश किनी,अंजली पाटील,प्रियांका कडू आणि बाडा पोखरण ग्रामपंचायत चे माजी सदस्य भालचंद्र कडू उपस्थित होते…
OTW ग्रुप चे अध्यक्ष संदेश चौधरी तसेच ग्रुप चे सदस्य कमलेश किणी,सचिव नितेश मडवे,रोहीत कडू, जयेश राऊत यांच्या सह स्टार ग्रुप,दोस्ती ग्रुप,बर्थडे ग्रुप च्या सदस्यांनी हि हजेरी लावली…