महाराष्ट्र परीट धोबी समाजसेवा मंडळाच्या वतीने अभिज्ञा राक्षे हिचा सन्मान

उपसंपादक हुसेन मुलांनी टाइम्स नाईन मराठी न्यूज नेटवर्क मोबाईल 97 30 867 448
दहावीच्या परीक्षेत १००% टक्के गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात प्रथम संपादन केल्याबद्दल महाराष्ट्र परीट धोबी समाज सेवा मंडळ च्या वतीने विज्ञान वीरेंद्र राक्षे हिचा फेटा शाल श्रीफल व भगवतगीता देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी आजी आजोबा आई वडील यांचा ही शाल श्रीफल हार घालून सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील अनेक संस्था व शिक्षण संस्था इतर शासकीय निमशासकीय संस्थेची पदाधिकाऱ्यांची शुभेच्छा देण्यासाठी रिघ लागली होती अभिज्ञा राक्षे.हिने मेडिकल फिल्ड मध्ये जाऊन जनतेची सेवा करण्याचा मनोदय व्यक्त केला सर्वानी तीची ईच्छा पुर्ण होवो शुभेच्छा दिल्या.
तसेच .सुहास गोपाळकर यांची मंगळवेढा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्था वर संचालक पदी निवडून आल्याबद्दल त्यांचा हि भव्य सत्कार करण्यात आला.या प्रसंगी .शांतीलाल प्रल्हाद कारंडे.अकलूज (प्रदेश उपध्यक्ष) अजय सोनटक्के (सोलापूर जिल्हाध्यक्ष ) दत्तात्रय क्षीरसागर (जिल्हा सचिव) .विरेंद्र वाघमारे. माळशिरस (तालुका अध्यक्ष) शेखर भोसले. (तालुका उपध्यक्ष) .सुनिल कारंडे पंढरपूर. गणेश दळवी माळशिरस शहर अध्यक्ष. सोलापूर चे ज्येष्ठ मार्गदर्शक गणपत भोसले. नंदकुमार भोसले..पप्पु भोसले. अशोक घोडके .सचिन चौधुले..संतोष काटकर. विजय वाघमारे. (सोलापूर शहर अध्यक्ष) .धनाजी गवळी .गवळीसर. मंगळवेढा अध्यक्ष कुमार गोपाळकर आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राक्षे यांनी केले. तर वीरेंद्र राक्षे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.



