महाराष्ट्र
सोलापूर उप प्रादेशिक साखर सहसंचालक पांडुरंग साठे यांना रयत क्रांती संघटनेच्या वतीने ऊस दर संदर्भात निवेदन सादर

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो.8007932121
सांगली : सोलापूर येथे उप प्रादेशिक साखर सहसंचालक पांडुरंग साठे यांना रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र कार्यअध्यक्ष मा श्री दीपक भोसले, नवनाथ माने, नामदेव पवार, अशोक पाटील, हणमंत गिरी, प्रफुल्ल कौलगे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्ह्य़ामध्ये सन 23/24 साठी येणार्या ऊसाला पहिली उचल 3000 रूपये व फायनल 3500 मिळाले पाहिजे ,

मागील हंगामात ज्या साखर कारखानदाराने एफ आर पी पूर्ण दिली नाही अशा कारखानदारांना गाळप परवाना देऊ नये ,आता आंदोलनाची सुरवात झाली आहे तरी सोलापूर जिल्ह्य़ातील ऊस उत्पादक शेतकर्यानी ऊस घालण्यास गरबड करू नये ह्या वर्षी ऊसाचे उत्पादन घटले आहे आपल्या ऊसाचा सोन्या सारखा भाव घेऊया असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे.



