शहर

पालघर स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या टीमने दमण बनावटीची अवैद्य दारू वाहतूक करणाऱ्या इसमांच्या आवळल्या मुसक्या

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत

होळी सणाच्या अनुषंगाने गुजरात राज्यातून दमण बनावटीची दारू अवैधरीत्या वाहतूक करून पालघर जिल्ह्यात आणणाऱ्या तीन इसमांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी आवळून त्यांच्या ताब्यातील पाच लाख पंधरा हजार पाचशे वीस रुपयांचा (5,15,520) एकूण मुद्देमाल जप्त करून या तिघांविरुद्ध कासा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करून त्यांना जेर बंद केले आहे.

येणाऱ्या होळी या सणाच्या अनुषंगाने पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट यांनी संपूर्ण जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक आणि विक्री यावर प्रतिबंध लादण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.

या आदेशाचे पालन करताना मुंबई अहमदाबाद मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार कपिल नेमाडे वॉच पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली होती की काही इसम चारोटी मार्गाने दमण बनावटची दारू महिंद्रा पिकअप गाडीने बोईसर येथे घेऊन जाणार आहेत. ही माहिती तात्काळ अंमलदार कपिल नेमाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखा पालघर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांना दिल्यावर पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट यांच्या आदेशान्वये पालघर स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली

स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, पोलीस उपनिरीक्षक भरतेश हारुगिरे, पोलीस हवालदार हिरामण खोटरे, पोलीस हवालदार कैलास पाटील या टीमने चारोटी टोल प्लाजा जलाराम मंदिरासमोर सापळा रचून रात्रीच्या सुमारास MH- 48-CB-1443 या क्रमांकाचा पांढरा रंगाचा पिकअप टेम्पो सह अजय गंगाराम जाधव वय वर्ष (29) राहणार जाधव पाडा डहाणू , किसन गोविंद जाधव वय वर्ष( 53)राहणार जाधव पाडा डहाणू व नरेश गणपत गिंभल वय वर्ष ते (33) गिंभलपाडा या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची व टेम्पोची अधिक झडती घेतली असता

या टेम्पो मधील मागील बाजूस निळ्या ताडपत्रीच्या खाली 65,520 किमतींच्या रॉयल स्ट्रॉंग, इम्पिरियल ब्लू, तसेच किंगफिशर बियरचे एकूण 41 बॉक्स असा एकूण पाच लाख पंधरा हजार पाचशे वीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती सापडला आहे. यावरून या तिघांना अटक करून कासा पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button