शहर
लाखेवाडी येथील हाॅटेल जय संतोषी मातावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा साडेचार हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

इंदापूर, प्रतिनिधी, – एस.बी.तांबोळी
मोबा – 8378081147
इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीतील हॉटेल जय संतोषी माता या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा घालत कारवाई केली आहे. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने देशी विदेशी मद्यासह बिअरच्या बाटल्या ताब्यात घेत मुंबई दारूबंदी कायद्यानुसार संतोष प्रभाकर खाडे आणि प्रभाकर तुकाराम खाडे (दोघे राहणार लाखेवाडी) यांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लाखेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सूत्रे हाती घेताच सरपंच चित्रलेखा ढोले यांनी लाखेवाडी पंचक्रोशीत सुरु असणारे दारूबंदी, मटका, जुगार सारखे अवैद्य धंदे मोडीत लढण्यासाठी १३ जानेवारी २०२३ रोजी महिलांची विशेष ग्रामसभा घेत ठराव मंजूर केला होता.पोलीस विभगासह महसूल विभागालाही याबाबतचे निवेदन पाठवण्यात आले होते. त्यानंतर इंदापूर पोलीसांनी याठिकाणी धाड टाकत २ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत मटका चालवणाऱ्या दोन इसमांवर कारवाई करण्यात आली होती.
त्यानंतर २३ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क दौंड विभागाचे निरिक्षक प्र. भा. पोळ यांच्या सुचनेनुसार कर्मचारी ए. के. पाटील यांनी लाखेवाडी हद्दीतील बावडा वालचंदनगर रोडलगत असणाऱ्या हॉटेल जय संतोषी माता या ठिकाणी धाड टाकून ४ हजार ५८० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात देशी, विदेशी, मद्य, बिअर अशा विविध ४० सीलबंद बाटल्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.



