महाराष्ट्र

डहाणू चिंचणी येथील कोळंबी प्रकल्पाला पुन्हा परवानगी देऊ नये… ग्रामस्थांची पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडे मागणी.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत

पालघर जिल्ह्यातील डहाणू चिंचणी येथील भाडेपट्टे करार संपलेल्या कोळंबी प्रकल्पास प्रशासनाने पुन्हा त्याच जागेवर कोळंबी प्रकल्प चालवण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी चिंचणी येथील ग्रामस्थांनी पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडे केली आहे.
डहाणू चिंचणी येथील गट क्रमांक 2475/12 मधील सरकारी खारटन जमीन जगन्नाथ वझे यांना तीस वर्षांपूर्वी म्हणजे 1992-93 रोजी कोळंबी प्रकल्प चालू करण्यासाठी 30 वर्षाच्या भाडे करार तत्वावर शासनाकडून देण्यात आली होती.

हा भाडे करार आता संपुष्टात आला असून या कोळंबी प्रकल्पाला पुन्हा त्याच जागेवर परवानगी देऊ नये कारण चिंचणी येथील मांगलवाडा, बारीपाडा,मोरीपाडा येथील ग्रामस्थांना या प्रकल्पामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असून गावातील सांडपाणी या प्रकल्पामुळे गावातच साचून राहते यामुळे या गावांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण होत असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने या ग्रामस्थांनी पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडे या प्रकल्पाला पुन्हा सुरू करण्यास व परवानगी देण्यास नाकारावे अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button