महाराष्ट्र

तथागत गौतम बुद्ध यांची जयंती अकलूज येथे विविध उपक्रमाने साजरी.

उपसंपादक—– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या 2567 वी जयंती अकलूज येथे विविध उपक्रमाने साजरी झाली.येथिल सारनाथ बुद्ध विहारात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते बुद्ध पुजा तर धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते पंचशील ध्वज फडकवण्यात आला.तर सायंकाळी अकलूज शहरातुन तथागत बुध्दाच्या प्रतिमेची मिरवणुकही काढण्यात आली होती.

वैशाखी पोर्णीमा बुद्ध जयंतीनिमित्ताने अकलूज येथील सारनाथ बुद्ध विहार येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते सारनाथ बुद्ध विहारात तथागताना अभिवादन करण्यात आले.तर धैर्यशील मोहिते-पाटील यांचे हस्ते धम्मध्वजारोहन करण्यात आले.यावेळी माजी सरपंच विठ्ठल गायकवाड,नाशिक सोनवणे,प्रविण लोंढे, बाळासाहेब गायकवाड,किरण धाईंजे,रिपाई जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले,वैभव गिते,भिमराव चंदनशिवे, विशाल मोरे,सचिन लोंढे आदी उपस्थित होते.

या वेळीपठण,धम्मदेसना, धम्मध्वजारोहण,बुद्ध पूजा व खीरदान असे कार्यक्रम पार पडले.तर अकलूज व परिसरातील बौद्ध उपासकांनी सारनाथ बुद्ध विहारात तथागताना अभिवादन केले.बुद्ध जयंतीनिमित्ताने बुधवार दि.३ मे ते शुक्रवार दि.५ मे २०२३ दरम्यान आयोजित केलेल्या बुद्ध महोत्सवात भिमा तुझ्या जन्मामुळे महानायकाच्या महागाथेच महानाट्याचे सादरीकरण झाले.तसेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी)चे विभाग प्रमुख डाॅ.सत्येंद्रनाथ चव्हाण यांचे महारांचा लष्करी व सांस्कृतिक इतिहास व समग्र भिमा कोरेगाव संग्राम या विषयावर प्रबोधन पर व्याख्यान पार पडले.

तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती दिनी बुद्ध पहाट या संगीतमय कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक विजय सरतापे आणि संच वालचंदनगर यांच्या बुद्ध व भिमगिताने श्रोते मंत्रमुग्ध केले.सायंकाळी अकलूज शहाराच्या मुख्य मार्गावरुन तथागत बुद्ध व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात आली.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारनाथ बुद्ध विहार समितीचे सदस्य प्रविण साळवे,संतोष पाटील,बाबा गायकवाड,अमर खरे,गणपत जाधव,कोळसे सर आदीनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button