खोडाळा वैद्यकीय अधिकारी यांच्या हलगर्जी पणामुळे पालघर जिल्ह्यातील 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत
पालघर जिल्ह्यातील 7 वर्षाच्या मुलीला विषारी साप चावल्यामुळे मृत्यू झाला यास जबाबदार असलेल्या आणि तिच्या उपचारादरम्यान हलगर्जीपणा करणारे खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी स्वप्निल वाघ यांना कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिली आहे.
पालघर जिल्ह्यातील खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सायदे ग्रामपंचायत हद्दीतील बोरीचापाडा या गावातील (7 वर्षीय )छाया सखाराम भोई ही आपल्या अंगणात संध्याकाळी खेळत असताना तिला साप चावल्यानंतर खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचारासाठी तिच्या कुटुंबीयांनी दाखल केले होते. यावेळी येथील डॉक्टरांनी तिला खेळताना लागण्याचे सांगून घरी जाण्यास सांगितले यावेळी घरी जात असताना तिला चक्कर आणि लघुशंका येऊन अस्वस्थ वाटू लागल्यावर तिच्या वडिलांनी परत उपचारासाठी त्याच रुग्णालयात आणल्यावर येथील वैद्यकीय अधिकारी स्वप्निल वाघ यांनी या मुलीला पुढील उपचारासाठी पुढे नेण्यास सांगितल्यावर
तिचे वडील तिला रुग्णवाहिकेच्या सहाय्याने मोखाडा रुग्णालयात नेत असताना तिचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला या मृत्यूस जबाबदार खोडाळा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी स्वप्निल वाघ आहेत असा आरोप मुलीचा वडिलांनी करून मुलीच्या आईने रुग्णालयाच्या आवारात आत्महत्या करण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने या डॉक्टरांना कार्यमुक्त केले असून त्यांना विलंबित करण्यात यावे असा प्रस्ताव देखील प्रशासनाकडे पाठवण्यात आल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी सांगितले.



