अकलूज येथे “सारथी”च्या वतीने मराठा कुणबी समाजाच्या युवकांसाठी CSMS-DEEP-Diploma कोर्स चे “मोफत “प्रशिक्षणाचे आयोजन

उपसंपादक ——हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था- सारथी पुणे, नियोजन विकास अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक संस्था महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित एम के सी एल पुणे ,यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजेच CSMS–DEEP Diploma या कोर्सचे मराठा- कुणबी, कुणबी- मराठा, समाजाच्या युवांसाठी मोफत प्रशिक्षण अकलूज येथील नवीन एसटी स्टँड समोर श्री हॉस्पिटल, शेजारी” लोणकर कॉम्प्युटर “येथे देण्यात येणार असून

1 जून 2023 पासून “सारथी” डिप्लोमा ची बॅच चालू होणार आहे त्याकरिता ज्या युवकांना या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचे आहे त्यांनी खाली दिलेल्या आवश्यक कागदपत्राची 30 मे 2023 पर्यंत पूर्तता करून “लोणकर कॉम्प्युटर”- अकलूज येथे खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे–मो.9309 150 655.

या कोर्सच्या प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे– 1) शाळा /कॉलेज सोडल्याचा दाखला (दाखल्यावर मराठा जातीचा उल्लेख असावा) 2)उत्पन्नाचा दाखला 3) आधार कार्ड (आधार कार्ड ला लिंक केलेला मोबाईल नंबर सोबत घेऊन यावे) 4) डोमासाईल 5) दहावी पास सर्टिफिकेट /मार्कशीट 6)वय 18 वर्षे पूर्ण असावे 7) फोटो व सही



