बोईसर येथील कार आणि दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू…. कार चालकावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत
पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्राजवळ रविवारी संध्याकाळी भरधाव वेगाने समोरून येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे या अपघातात दुचाकी वरील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
बोईसर नांदगाव रस्त्यावर पाम गावाजवळ रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता एका भरधाव वेगवान कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्यामुळे या दुचाकी वरील नरेंद्र बारी राहणार बोईसर नवापूर (वय वर्ष 45) व रुपेश बारी (वय वर्ष 34) या दोघांना जबरी दुखापत होऊन मार लागल्यामुळे या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला या अपघातास जबाबदार असलेला कार चालक ओमकार पाटील (वय वर्ष 22) व त्याचा साथीदार आशुतोष कानेरी (वय वर्ष 24) या दोघांना पोलिसांनी अटक करून या दोघांवर गुन्हे दाखल करून त्यांना पालघर कोर्टात हजर केले असता पालघर कोर्टाने या दोघांना 25 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.



