राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्यावर सुरबुद्धीने केलेल्या कारवाई चा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने निषेध

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्यावर सुडभावनेने ई डी ची कारवाई केल्याने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकारचा उपविभागीय अधिकारी अकलूज यांना दिलेल्या निवेदनाद्वारे जाहीर निषेध केला आहे

आज देशात विशेषतः बिगर भाजपशासित राज्यात आणि महाराष्ट्रात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यासाठी लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवून सत्तेचा गैरवापर करून व केंद्रीय यंत्रणेच्या दुरुपयोग विरोधी पक्षाचे मुस्कटदाबी करण्यासाठी सत्ताधारी करत आहेत विरोधकांना संपविण्याचे सुडाचे व विध्वंसक राजकारण देशाच्या व राज्याच्या हिताचे नसून विरोधकांवर सुरू असलेल्या दबाव तंत्राला लोकशाही मार्गाने विरोध करणे हे निरोगी लोकशाही करिता आवश्यक आहे लोकशाही पुर्नस्थापित करण्यासाठी आमची भूमिका केंद्र व राज्य सरकारला कळवावी अशी विनंती सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी उपविभागीय अधिकारी अकलूज यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष– अशोक राव गायकवाड ,प्रदेश सचिव– तुकाराम साळुंखे पाटील, सोलापूर जिल्हा अध्यक्ष– धनंजय साठे माळशिरस तालुका अध्यक्ष– रजनीश बनसोडे ,अकलूज शहर अध्यक्ष –अभिषेक गायकवाड सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरणभाऊ साठे ,सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा सरचिटणीस– साजिद भाई सय्यद ,माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे — उपाध्यक्ष जाकिर शेख, अकलूज शहर युवकाध्यक्ष- अविनाश सोनवणे, माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस प्रसिद्धीप्रमुख –सयाजीराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते



