पोलीस आणि जनता यांच्यातील संवाद बंद झाल्याने एकमेकातील ओलावा आटला आहे

बी टी शिवशरण
जे कायद्याचा सन्मान करतात त्यांच्या कडून नेहमीच सामाजिक वैचारिक परिवर्तनवादी विचार एकात्मता बंधूभाव सामाजिक सलोखा वाढवून शांततेसाठी प्रांजल प्रयत्न केले जातात जे आदराने एकमेकांना जवळ करतात तेथे आत्मीयता कायम टिकून रहाते पोलीस आणि जनता यांचे नाते कायम ऋणानुबंध अबाधित करणारे असले पाहिजेत पोलिसांना मदत सहकार्य त्यांच्या प्रती आदराची भावना प्रत्येक समाज घटकातून असली पाहिजे
पोलीस हा समाजातील घटक आहे त्यांनाही मन भावना कुटुंब आहे ज्या वेळी आपण सर्व सण उत्सव यात्रा जत्रा सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या कुटुंबा बरोबर पाहुन आनंद घेत असतो त्या वेळी पोलीस कायदा सुव्यवस्था संभाळून आपले रक्षण करत असतात त्यावेळी त्यांच्या भावना मन ओळखून त्यांना खरे तर दाद दिली पाहिजे मात्र हल्ली पहिल्या सारखे वातावरण राहिले नाही पोलीस आणि जनता यांच्यातील सुसंवाद नसल्याने आपुलकी जिव्हाळा राहिला नसल्याने सामाजिक दरी वाढली आहे सततचा बंदोबस्त संरक्षण मोर्चे आंदोलन अस्थिर सरकार यात पोलिसांचा वेळ शक्ती मानसिकता हरवली आहे
पोलीस खात्यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे पोलीस खात्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन धुसर होऊ शकतो मात्र अनेक पोलीस कर्मचारी अधिकारी अतिशय प्रामाणिक व स्वच्छ प्रतिमा असलेलेही आहेत सुधारणा बदल होणं अपेक्षित आहे सामाजिक सुधारणा शिस्त नियम शांतता कायद्याचे पालन ही जबाबदारी फक्त पोलीस यंत्रनेचीच रहात नाही तर समाजातील प्रत्येक नागरिकांची सुद्धा आहे
समाजातील वाईट प्रवृत्ती बाजूला काढून चांगल्या बाबींना स्वीकारणे हे प्रत्येकाचे कर्तव्य न्हवे नैतिक जबाबदारी आहे अधिकार हक्क स्वातंत्र्य पाहिजे पण कर्तव्य पार पाडण्याची वेळ येते तेव्हा मला काय त्याचे असे म्हणून जबाबदारी झटकणाऱ्यांची संख्या कमी नाही मोबाईल इंटरनेट मुळे घराघरातील नात्यांनात्यातील संवाद कमी झाला आहे त्यामुळे चांगले वाचन मित्र कार्यक्रम यावर मर्यादा आल्या आहेत



