अकलूज नगरपरिषद येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला.

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
जागतिक महिला दिनानिमित्त अकलूज नगरपरिषद चे मुख्याधिकारी .दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शना खाली महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात आले.
यावेळी देवन्या शिवतेजसिंह मोहिते पाटील (वहिनी साहेब),जिल्हा परिषद सदस्या .सुनंदाताई फुले, डॉ.वैष्णवी शेटे,माजी सरपंच .पायल मोरे,माजी ग्रामपंचायत सदस्या वैष्णवी दोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती,

यावेळी विविध क्षेत्रात सामाजिक कार्य केल्याबद्दल नगरपरिषद तर्फे महिलांना गौरवण्यात आले १) एव्हरेस्ट वीर निहाल बागवान यांच्या आई वीर माता बागवान मॅडम २) शैक्षणिक क्षेत्र .मंजुश्री जैन मॅडम ३)रोटरी डिलाईटच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या सोनाली सोनाज मॅडम ४) कृषी क्षेत्रातील कार्य व महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले बद्दल अरूंधती हजारे मॅडम ५) स्मृती महिला बचत गट व गटातील सर्व महिलांचा बचत गटामार्फत यशस्वी उद्योग चालवून गटाचा आर्थिक दर्जा उंचावल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

६) वैद्यकीय क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. .वैष्णवी शेटे मॅडम ७) माळेवाडी मध्ये आदर्श अंगणवाडी सेविका व महिलांसाठी विशेष सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल .रेखा कांबळे मॅडम या सर्व महिलांचा अकलूज नगर परिषद तर्फे शाल,श्रीफळ,सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी स्त्री रोग तज्ञ डॉ.वैष्णवी शेटे मॅडम यांनी आरोग्य विषयक महिलांसाठी योग्य मार्गदर्शन केले,याचबरोबर मंजुश्री जैन मॅडम यांनी मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व आणि महिलांचे आरोग्य या विषयी मार्गदर्शन केले,यानंतर महिलांसाठी संगीत खुर्ची आणि लिंबू चमचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते,यामध्ये प्रथम,व्दितीय, तृतीय क्रमांक काढण्यात आले व लगेच मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले

या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लोकायत लोकसंचालित साधन केंद्राच्या .कामिनी ताटे देशमुख मॅडम व त्यांच्या सर्व सीएलएफ ऑफिस महिला कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले,या कार्यक्रमासाठी अकलूज नगरपरिषद महिला बालकल्याण विभाग प्रमुख .नाजनीन शेख मॅडम व सर्व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.



