महाराष्ट्र

बागबान जमियत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ३० जून ला वधू-वर परिचय मेळावा…

सोलापूर : बागबान जमियत चॅरिटेबल ट्रस्ट आणि सोलापूर शहर जिल्हा बागबान जमियत ट्रस्टच्या वतीने मुस्लीम समाजातील सर्वच घटकांमधील इच्छुक वधू-वर आणि पालक परिचय मेळाव्याचे आयोजन ३० जून रोजी किडवाई चौक येथील केएमसी गार्डन येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती ट्रस्ट चे अध्यक्ष नजाकतअली मंद्रुपकर,माजी नगरसेवक रियाजभाई बागवान यांनी दिली,मेळाव्याचे यंदा चौथे वर्ष आहे या मेळाव्यात बागवान,शेख,तांबोळी,अत्तार,कुरेशी,बक्कर खाटीक,खान,काझी,पठाण,मनियार,मुल्ला,मोमीन,पटवेघर,मुजावर आदी जमातीतील पालकांसमोर आपल्या मुलाबाळांच्या लग्नाची चिंता आहे.ही चिंता दूर करण्यासाठी ट्रस्टने या वधू-वर मेळाव्याचे आयोजन केले आहे…

नजाकतअली मंद्रुपकर (४२३ जोडभावी पेठ,मंगळवार बाजार,जिनतुल इस्लाम मस्जिदजवळ,मो. ९९२२३५७०५३) येथे अथवा मस्जिदजवळील कार्यालयात दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मेळावा यशस्वी करण्यासाठी कलीमभाई तुळजापुरे,हाजी मैनोद्दीन शेख,हाजी अ. वाहिद चौधरी,राजूभाई पैलवान,शकीलभाई मौलवी,जुबेरभाई बागवान,जुबेरभाई कुरेशी,जाकीरभाई नाईकवाडी आदी परिश्रम घेत आहेत. मेळाव्यात इच्छुक वधू-वर आणि पालकांच्या भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
कोट
मागील तीन मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्या कारणाने गोरगरिबांच्या मुलांचे लग्न सहजपणे मेळाव्यातून जुळत असतात.त्यासाठीच यंदा चौथ्याही वर्षी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.इच्छुक वधू-वर आणि त्यांच्या पालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले…
*नजाकतअली मंद्रुपकर*
अध्यक्ष :- बागबान जमियत चॅरिटेबल ट्रस्ट,सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button