मुलींसाठीचा मोफत शिक्षणाचा निर्णय लव करात लवकर अंमलात आणावा – सौ. शितल कांबळे
करमाळा (प्रतिनिधी ) -अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
राज्यातील उच्च शिक्षणाच्या ६४२ अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली आहे परंतु या निर्णयाची शासन स्तरावर अंमल बजावणी होत नाही या संदर्भात आपण लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार असल्याचे रावगाव शाळा व्यवस्थापन समिती सदस्या व प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान च्या सचिवा सौ .शितल रामदास कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे त्या बोलताना म्हणाल्या की या निर्णयाचा २०लाख मुलींना फायदा होणार आहे त्यासाठी सरकार १८०० कोटी रुपयांची तरतूद करणार आहे
परंतु आता प्रवेश प्रक्रिया सुरू होत असतानाही त्या संदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी संपूर्ण फी भरावीच लागेल अशी भूमिका महाविद्यालयांनी घेतली आहे मोफत शिक्षणाच्या निर्णयाचा राज्यातील २०लाख मुलींना लाभ होईल असे शासनाकडून सांगण्यात आले आहे आत्ता एवढ्या मुलींना शासनाच्या निर्णयाच्या अंमलबजावणी अभावी आता महाविद्यालयाचे शैक्षणिक शुल्क स्वतःहून भरावे लागणार आहे म्हणून आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना लेखी निवेदनाद्वारे या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची मागणी केल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे.