शहर

सफाळे विळंगी गावचे उपसरपंच आणि मनसे पालघर उपतालुका अध्यक्ष यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलांसह आई-वडिलांवर गुन्हे दाखल

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640.

पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील विळंगी गावचे विद्यमान उपसरपंच आणि मनसे पालघर उपतालुका अध्यक्ष चेतन पाटील यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या वैभव पाटील सह त्यांच्या आई वडिलांवर देखील केळवा सागरी पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील विळंगी गावातील ग्रामस्थ बुधवार दिनांक 19 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी गणपती विसर्जन करण्यासाठी जात असताना त्या रस्त्यावर विळंगी गावातील वैभव राजेंद्र पाटील यांनी आपल्या चिकन शॉप मधील कोंबडीच्या रक्ताचे पाणी भर रस्त्यात सांडल्यामुळे ग्रामस्थांना याचा त्रास होतो असे वैभव पाटील याला सांगितल्यावर वैभव पाटीलने याचा राग मनात धरून लोखंडी रॉडणे चेतन पाटील यांच्या डोक्यावर तोंडावर आणि हातावर मारहाण करून त्यांना जीवे ठार मारण्यासाठी लोखंडी सुरा घेऊन गेले असताना ग्रामस्थांनी वैभव पाटील यांना पकडून ठेवल्यामुळे चेतन पाटील यांचा जीव थोडक्यात बचावला आहे.

सध्या चेतन पाटील यांच्यावर पालघर येथील आरोग्यम या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून केळवा सागरी पोलिसांनी वैभव राजेंद्र पाटील आणि त्याला सहकार्य करणारे त्याचे वडील राजेंद्र गजानन पाटील आणि वैभव याची आई अशा तिघांविरुद्ध केळवा सागरी पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button