शहर

अकलूज नगर परिषदेच्या पथविक्रेता समिति वर हसन माढेकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल दादाभाई तांबोळी मित्र मंडळाच्या वतीने सत्कार

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

अकलुज नगरपरिषदेच्या वतीने पथविक्रेता समिति मध्ये अल्पसंख्यांक प्रवर्गातुन बिनविरोध निवड झाल्याचे प्रमाणपत्र हसन बागवान (माढेकर) यांना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे साहेब व इतर पदाधिकारि यांच्या उपस्थितीत देण्यात आले…

हसन माढेकर हे मोहिते पाटील गटाचे कट्टर समर्थक म्हणून परिसरात ओळख असलेले कार्यकर्ते असुन ते भैय्या माढेकर यांचे कनिष्ठ बंधू होत…

हसन माढेकर यांच्या निवडीने अकलूज मधील पथविक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण…

समिति मध्ये निवड झाल्याने अकलूज ग्रामपंचायतचे माजी सदस्य व अकलूज नगर परिषदेचे भावी नगरसेवक दादाभाई तांबोळी मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार व अभिनंदन करत पुढील कारकिर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या…

या वेळी एकता बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जावेद ( बाबा ) तांबोळी,महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले घोडे व्यापारी अफसर इलाही तांबोळी,टाईम्स 9 मराठी न्यूज चॅनेल चे संपादक नौशाद मुलाणी, माजी माळशिरस पंचायत समिती सदस्य अँड.दत्तात्रय ( बापू ) मुंडफणे,फारुक शेख,दत्तू सुरवसे,रफिक भाई बागवान,अजीज सय्यद, बापू जाधव,आणि बहुसंख्य पथविक्रेता उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button