शहर

आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आदिवासी समाजाने एकत्र यावे-प्रदिप वाघ यांचे आवाहन.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत

खोडाळा येथे आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती व सर्व आदिवासी संघटना यांच्या वतीने आयोजित केलेल्या मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलना वेळी श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले जेव्हा जेव्हा आदिवासी समाजावर अन्याय होईल तेव्हा तेव्हा समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.मणिपुर येथील घटना अमानवीय आहे या घटनेचा निषेध तर करुयाच पण दोंषी वरती कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी शासनाकडे करत आहेत असे हि त्यांनी सांगितले.

तसेच खोडाळा शहरातुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातुन निषेध रॅली भर पावसात काढण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी मणिपूर घटनेचा निषेध असो व आदिवासी क्रांतिकाकांचा जयघोष करण्यात आला.नंतर पोलिस उपनिरीक्षक संजय भुसाळ यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी खोडाळा सरपंच कविता पाटील,उधळे वाकडपाडा सरपंच सौ लता वारे,करोळ सरपंच नरेंद्र येले,नाशेरा सरपंच रवि धिंडा,कारेगाव सरपंच हनुमंत फसाळे, उपसरपंच नंदकुमार वाघ, परशुराम अगिवले , हनुमंत पादीर,माजी उपसभापती एकनाथ झुगरे, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद झोले,भरत गारे गुरुजी, विष्णू हमरे, प्रभाकर पाटील, देवराम कामडी, संजय हमरे, सचिन पाटील, उमाकांत हमरे, संजय साळवे, दिलीप जागले, आकाश कडु, मुरलीधर कडु, निलेश ठोमरे अंनता वारे, जितेंद्र पाटील, सखाराम शिद ,विजय वाघ, जगन झुगरे,आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती चे कार्याध्यक्ष मंगेश दाते, उपाध्यक्ष रमेशज बोटे इत्यादी पदाधिकारी व मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button