महाराष्ट्र

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालय शंकरनगर- अकलूज येथे पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्राचे पालक व विद्यार्थी यांच्या हस्ते उद्घाटन

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

राज्य समाईक प्रवेश कक्षामार्फत पदवी अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीयभूत पध्दतीने राबविली जात आहे . विद्यार्थ्यांना पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी नाव नोंदणी व अर्ज निश्चिती करता यावी. याकरीता राज्य समाईक प्रवेश कक्षा मार्फत सहकार महर्षि शंकरराव मोहिते – पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च , शंकरनगर- अकलूज या महाविद्यालयास पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ च्या सुविधा केंद्रास ( FC Centre ) मान्यता देण्यात आलेली आहे .

सुविधा केंद्राचे उद्घाटन दि . २६/०६/२०२३ रोजी झाले. सुविधा केंद्राचा क्रमांक FC6782 असा आहे . सदर सुविधा केंद्रामध्ये प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांसाठी विद्यार्थ्यांना नाव नोंदणी व अर्ज निश्चिती करता येणार आहे . सुविधा केंद्र सकाळी ० ९ .३० ते सायंकाळी ०५.३० या वेळेमध्ये सर्व दिवशी चालू राहणार आहे . अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . प्रविण ढवळे यांनी दिली . यावेळी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री. शब्बीर शेख, सुविधा केंद्रप्रमुख प्रा . सचिन पांढरे व प्रा . अनिल कोकरे तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख , शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते .

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इतर ठिकाणी जावे लागत होते. अशा विद्यार्थ्यांना अकलूजमध्येच सर्व सोयी मिळाव्यात या हेतूने सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयास सुविधा केंद्राची मंजुरी मिळालेली आहे . सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पदवी अभियांत्रिकीच्या सिव्हील इंजिनिअरींग , कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग व मेकॅनिकल इंजिनिअरींग या शाखा उपलब्ध आहेत. सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालय हे अभियांत्रिकी शिक्षणासोबतच विद्यार्थी उद्योजकता मार्गदर्शन व पाठपुरावा याची सुविधा उपलब्ध करून देणारे सोलापूर जिल्हयातील एकमेव महाविद्यालय आहे . तरी अकलूज व परिसरातील पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी व अभियांत्रिकी प्रवेशासाठी सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड करावी असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . प्रविण ढवळे यांनी केले आहे .

डॉ . प्रविण ढवळे
प्राचार्य
सहकार महर्षी शंकरराव माहिते – पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च , शंकरनगर – अकलूज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button