महापुराच्या धोक्यामुळे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तामलवाडी येथील गट नंबर ४४ येथील मंजूर एन ए व लेआउट रद्द करण्याची मागणी.

उपसंपादक——-हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथील वडगाव (काटी) रस्त्यालगत व नदी/ ओढ्याचा काठ यांच्यामध्ये व तुळजापूर-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग ५२ च्या पश्चिमेस गट क्रमांक ४४ मध्ये तुळजाई पार्क नावाची प्लॉटिंग जाहिरात प्रसिद्धीप्रमाणे शासनाने एन. ए. व लेआउट मंजुरी दिल्यामुळे

त्यास रद्द करण्याकरिता मोजे तामलवाडी येथील माजी सैनिक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा उपाध्यक्ष शिवाजी रामकृष्ण सावंत व तामलवाडी येथील काँग्रेस पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य सतीश मच्छिंद्र माळी यांनी लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी धाराशिव, मुख्य नगर रचना अधिकारी धाराशिव, तहसीलदार तुळजापूर, दुय्यम प्रबंधक तुळजापूर व ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी यांना एका तक्रारी निवेदनाद्वारे दिली आहे

त्यांच्या तक्रारीमध्ये सदरील प्लॉटिंगमध्ये बांधकाम किंवा वॉल कंपाऊंड केल्यास संपूर्ण गावात नदीतील पाण्याचा महापूर येऊन जीवित व वित्त हानी होऊ शकते तसेच सदरील प्लॉटिंग एन.ए. व लेआउट करिता ओपन स्पेस ची जागा धोक्याच्या किंवा चुकीच्या ठिकाणी निवडलेली आहे व नदी/ ओढयाच्या पाण्याची पातळी संबंधित कुठलीही माहिती ग्रामपंचायत कार्यालयास विचारात न घेता व धोक्याच्या ठिकाणाची प्रशासकीय नियमावलीतील हिरवा किंवा पिवळ्या पट्ट्याबाबत कल्पना गावकऱ्यांना विश्वासात न घेता मंजुरी देण्यात आली आहे

ती तत्काळ रद्द करण्यात यावे व सदरील प्लॉट खरेदी-विक्री करण्यास मनाई करून महापुरामुळे भविष्यात होणारी वित्त व जीवित हानी टाळावी अशी मागणी सावंत व माळी यांनी लेखी तक्रारी निवेदनात केली आहे त्याचबरोबर सदरील प्लॉटिंग विषयी ग्रामस्थांना चर्चा केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आक्रोश निदर्शनास येत आहे याबाबत प्रशासन काय निर्णय घेते त्याकडे संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



