महाराष्ट्र

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पाटील गटाकडून कार्यकर्त्याच्या समवेत बैठकांचे सत्र अद्यापही सुरूच.तालुक्यातील साठ गावांनी माजी आमदार नारायण आबा पाटील घेतील त्या निर्णयास दिला आपला पाठिंबा.

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

पाटील गटाकडून कार्यकर्त्यांच्या समवेत बैठकांचे सत्र सुरु असून आतापर्यंत साठ गावांनी माजी आमदार नारायण (आबा) पाटील घेतील त्या निर्णयास आपला पाठींबा असल्याचे सांगून योग्य पक्षाकडून उमेदवारी दिली गेली तर लोकसभा निवडणूक लढवावी अन्यथा विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करावे असे मत मांडले असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली. माढा लोकसभा मतदार संघातील राजकीय घडामोडींना वेग आला असून पाटील गटाने गेले तीन दिवस बैठकांचे सत्र राबवले.

याबाबत अधिक माहिती देताना तळेकर यांनी सांगितले की आतापर्यंत जवळपास साठ गावांतील पाटील गटाच्या आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जेऊर ता. करमाळा येथील आयोजित बैठकीस उपस्थित राहुन आपली मते मांडली. तसेच त्यांच्या गावातील मतदारांचा कौल, सर्वसामान्य नागरिकांना बदल‌ हवा की नको, नारायण आबा पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी की नको, विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन आताच योग्य त्या पक्षात प्रवेश करुन विधानसभेसाठी उमेदवारीचा शब्द घ्यावा अशी मते संमिश्र भावना व्यक्त करत मांडली.

तर अनेकांनी मागील विधानसभा निवडणुकीत एखाद्या पक्षाची उमेदवारी घेतली असती तर आपला पराभव झाला नसल्याचे सांगत आता तो अनुभव लक्षात घेऊनच योग्य तो निर्णय नारायण आबा पाटील यांनी घ्यावा असे सांगितले. या बैठकांना सभापती अतुल पाटील, उपसभापती दत्ता सरडे, माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, प्राचार्य जयप्रकाश बिले, जि प सदस्य बिभीषण आवटे, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, सरपंच पृथ्वीराज पाटील, बाजार समिती संचालक रणसिंग बापु, महेंद्र पाटील आदि पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहुन कार्यकर्त्यांच्या भावना व मते जाणून घेतली. तर पाटील गटाचे मार्गदर्शक तथा भारत प्रसारक मंडळाचे सचीव प्रा अर्जुनराव सरक यांनी आतापर्यंतच्या बैठकीत कार्यकर्त्यांना सध्याच्या राजकीय घडामोडींवर आधारित पाटील गटाशी निगडीत आतापर्यंत झालेल्या घडामोडींबाबत माहिती दिली.

तर या बैठकांचे आयोजन एन पी मिशन 24 या सोशल‌ मिडीया ग्रुप कडुन करण्यात आले. अजून दोन बैठकीतुन उर्वरित गावांचा कौल जाणून घेतला जाणार असल्याने आठवडाभरात पाटील गटाकडून मोठा निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिले. या बैठकानंतर करमाळा तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button