शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माळशिरस तालुक्याच्या वतीने माळीनगर येथील साखळी उपोषणास जाहीर पाठिंबा.

प्रतिनिधी…. रियाज मुलाणी
मो.9921500780
माळीनगर येथे उपोषणास बसलेल्या माळीनगर ग्रामस्थांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माळशिरस तालुका यांचे वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. माळीनगर मधून झालेल्या पालखी महामार्गामुळे माळीनगर मध्ये रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे समस्त माळीनगर येथील रहिवाशी बेमुदत साखळी उपोषण करीत आहेत.

हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरणानुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या ब्रीदानुसार समाजसेवेसाठी माळशिरस तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माळीनगर ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे व आपणास फक्त पाठिंबा देऊन शांत बसणार नाही तर आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत या गोष्टीचा आम्ही देखील जातीने पाठपुरावा करू व माळीनगरकरांना आपला हक्क मिळवून देऊ असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले.
यावेळी माळशिरस तालुका प्रमुख संतोषभैय्या राऊत,अकलूज शहर प्रमुख अनिल बनपट्टे,लक्ष्मण डोईफोडे, अरुण मदने, मिलिंद मोरे, व शिवसैनिक उपस्थित होते.



