शहर

सफाळे मांडे ग्रुप विविध कार्यकारी सेवा सोसायटी कडून शेतकऱ्यांना कर्ज वाटपामध्ये विलंब…

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजयी घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिम येथील मांडे ग्रुप विविध कार्यकारी सेवा सोसायटी मार्फत या सोसायटीचे असलेले सदस्य शेतकऱ्यांना पावसाळ्याआधी बी-बियाण्यासाठी मिळणारे कर्ज या सोसायटीने न दिल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना ग्राहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे या सोसायटी विरुद्ध या भागातील शेतकऱ्यांकडून तीव्र संताप जनक प्रतिक्रिया व्यक्त केला जात आहेत.

सफाळे पश्चिम भागातील मांडे,विठ्ठलवाडी, विराथन,जलसार कांद्रेभुरे,शिलटे या गावातील जवळपास 500 शेतकरी मांडे ग्रुप विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सदस्य आहेत.

हे शेतकरी पावसाळ्याआधी या सोसायटी मधून बी-बियाणे, खत व शेतीचे अवजारे आणण्यासाठी कर्ज घेतात हे कर्ज एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देणे बंधनकारक असून देखील या सोसायटीने जून महिन्याचे दोन आठवडे उलटून देखील या शेतकऱ्यांना कर्ज न वाटप केल्यामुळे या शेतकऱ्यांना आपली शेती योग्य वेळेवर करण्यासाठी बी- बियाणे, शेतीची अवजारे,खत आणण्यासाठी बाहेरून कर्ज काढून या वस्तू आणाव्या लागत आहेत.

यामुळे या सोसायटीच्या सदस्य असलेल्या शेतकऱ्यांकडून या सोसायटी विरुद्ध संताप जनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button