महाराष्ट्र

नगरसेवक व्हायचंय!.. नगरसेवक होण्यासाठी काय करावे?

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

ज्याला नगरसेवक व्हावेसे वाटत असेल तो व्यक्ती हुशार असला पाहिजे,गर्दी मध्ये काहिही निरर्थक आणि मुर्खासारखा बडबडणारा नसावा,तो उच्चशिक्षित असला तर उत्तमच…

कारण शासनाच्या योजनांचा जनते पर्यंत जाऊन लाभ देणारा नगरसेवक असावा,त्याच्या बोलण्यातून गोडच वाणी बाहेर निघावी…

आपला कामधंदा असेल तर तो सांभाळण्यासाठी विश्वासू माणूस शोधून घराचे रोजी रोटी शाबूत राहील व उत्पन्नाचे स्त्रोत शाबूतराहील.याची काळजी घ्यावी.हाती कामधंदा नसेल व पैशातून राजकारण व राजकारणातून पैसा उभारण्याची तुमचा हेतू व आपण तसे करू शकता असा आत्मविश्वास असेल तर प्रश्न नाही…

वार्डात ओळखी व संबंध वाढवा,त्याला वार्डातील प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक ओळख असली पाहिजे,वर्षातून किमान २ प्रीती भोजनाचे जनरल (शाकाहारी व मांसाहारी) कार्यक्रम स्वखर्चाने आयोजित करा.महिलासाठी सुधा २ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करा.त्यात संक्रांती चे हळदी कुंकू व सवाष्ण भोजन असे कार्यक्रम आयोजन करा…

स्वत;चे घरातील लहान मुला पासून ते जेष्ठ सदस्याचे वाढ दिवस आवर्जून साजरे करा.वार्डात प्रत्येक नागरिकास आमंत्रण द्या.जेवण द्या भेट वस्तू नाकारा.उलट रिटर्नगिफ्ट द्या…

गावात ग्राम दैवतजत्रा निमिताने मांसाहारी जेवणाचे आयोजन करता आले तर अति उत्तम कारण प्रत्येकाचे घरी यात्रे निमित्ताने जेवण असतेच . दिलेल्या आमंत्रणातील निम्मे लोक सुधा येणार नाहीत.मात्र आपला उदार व दानशूर स्वभावाचे दर्शन मतदारांना होईल…

लहान मुले मुली यांचे क्रीडा स्पर्धांचे आयोजन करा.घरातील स्वर्गवासी व्यक्तीचे स्मरणार्थ बक्षीस जाहीर करा. वार्षिक दिन दर्शिका छापून त्यात वार्डातील व्यावसाईक यांच्या जाहिराती छापा,प्रत्येक नागरिकांचे जन्मदिवस/वाढदिवस त्यात नमूद करा व न चुकता पत्नी सह जाऊन बुके देऊन शुभेच्छा द्या…

वार्डातील गुणवंत विध्यार्थी यांचे अभिनंदनाचे फ्लेक्स चौका चौकात लावा शुभेच्छा म्हणून तुमचा फोटो मात्र मोठ्या आकारत न वीसरता छापा.फोटो मध्ये गळ्यातील सोनसाखळी व हातातील ब्रेसलेट बोटातील अंगठ्या याचे प्रदर्शन करू नका….

आपला वार्डात कोणत्या सामाजिक श्रेणीतील लोक वास्तव्यास आहेत,याचा अभ्यास करून फ्लेक्स मधील फोटो दाढी मधील हवा कि बिगर दाढी मधील गुळगुळीत हवा हे निशित करा’,शांतता प्रिय लोक असतील तर दाढी मधील फोटो सूट होणार नाही,भला मोठागंध लावण्याची व दाढी मधील फोटो ची निवड वार्डातील श्रेणी पाहूनच निशित करावी.(श्रेणी म्हणजे अल्प उत्पन्न गटातील मजूर वर्ग, हॉंकर्स, इ. ची वसाहत दुसरी म्हणजे चांगल्या व विद्वान लोकांची व्यापारी नोकरदार (इ,)

वार्डात कोणताही दुखद प्रसंगी उपस्थिती दाखवावी.अपघात.मयत,दुर्घटना दहावे तेरावे श्राद्ध हे कार्यक्रम चुकवू नयेत.वार्डातील प्रत्येक नागरिकास नावाने हाक मारतायेईल इतकी तयारी करावी. ते शक्य होण्यासारखे नसेल तर प्रत्येक गल्ली मध्ये अघोषित व मन मान्य बिनपगारी सेक्रेटरी ठेवावा. गल्लीत फिरताना त्याचेवर समोर आलेल्या नागरिकाचे नाव आठवून देण्याची किवा हळू आवाजात कानात सांगण्याची (ओठ न हलवता) जबाबदारी सोपवावी.त्यास त्याचा कामधंदा संभाळण्या पेक्षा तुमच्या बरोबर फिरण्यात अभिमान वाटला पाहिजे. अशी सवय लावावी…

वार्डात एखाद्या कुटुंबाचे घरी गेल्यावर छोटी मुले असतील तर उचलून’ घ्यावी.अशा वेळी त्यांचे नाक व इतर गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची सवय करून घ्या.त्याचे कोतुक करा.पापे घ्या…

वार्डातील प्रत्येक गल्ली मध्ये आठ दिवसातून एकदा सहज व वेळ प्रसंगी तात्काळ जाने झाले पाहिजे…

पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस यांचेशी सपर्क व ओळखी वाढवा महिन्यातून किमान एकदा त्यांना घेत असल्यास मदिरापान मांसाहार जेवण होटल मध्ये द्या. घरी जेवण देण्याचे टाळावे…

नगरपालिका अधिकारी कर्मचारी यांचेशी मैत्रीपूर्ण संबंध स्थापित करा.शक्य झाल्यास त्यानाही अधून मधून सामिष पार्टी देत चला.कारण जनतेची कामे जरी करायाची असली तरी हे लोक सहसा लक्ष देत नाही.वीजवितरण कंपनी,तलाठी कार्यालय,नागरिकांचे कामे असतील असे सर्व शासकीय कार्यालया मधील अधिकारी कर्मचारी यांचेशी खर्च करून मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करा.कारण जनतेची कामे करून श्रेय घ्यायचे असते…

आता निवडणुक जवळ आली आहे. नागरिकांशी संपर्क पुन्हा सुरु ठेवा. वर्ष भरात किती खर्च झालाआहेयाचा हिशोब करा.समोरचा नगरसेवक निवडणुकीत कितीखर्च करणारआहे याचाअंदाज घ्या त्याचे पेक्षा जादा खर्च करण्याची आर्थिक तरतूद करा…

जेवणावळी कार्यकर्ते यांचेवर खर्च किती करावे लागतील याची तरतूद व अंदाज करा.हे खर्च व हिशोब निवडणुकीचे खर्चात धरले जाऊ नयेत म्हणून विश्वासू व्यक्तींची नेमणूक करा.त्याचेकडे पैसेसुधा देऊन टाका…

अधिकृत निवडणुकीचे खर्चाची तरतूद करा .ते बजेट वास्तव खर्चाचे १० टक्के सुधा नसते…

आता तुम्ही निवडून आला आहात.गुलाल मिरवणूक हार गुच्छ फटाके याची तजवीज करा…

वार्डा मधून प्रत्येक गल्लीतून मिरवणूक काढण्याचे आधीच रथ चालकास सूचना करून ठेवा.उत्साही कार्यकर्ते यांचेकडे फटाके गुलाल सोपवून ठेवा.प्रत्येक घरा घरा पुढे माता भगिनी आपले ओक्षण करतील त्यांचे पदकात किमान ५० ते१०० रु. टाकण्याची काळजी घ्या. मत दिले असेल किवा नसेल हा विचार करू नका.आता तुम्ही नगरसेवक झालात ते फक्त मत देणाऱ्यांचे नसून वार्डातील सर्व नागरिकांचे नगरसेवक झाला आहात हे स्मरणात ठेवा…

आठ दहा दिवसात दोन वेग वेगळे भोजन (शाकाहारी.मांसाहारी ) आयोजित करा…

संपूर्ण निवडणुक पार पडली आहे.निवांत बसून मागील ५ वर्षा पासून नगरसेवक होण्यासाठी केलेली तयारी व त्यासाठी दिलेला वेळ आणि झालेला खर्च याचा हिशोब करा. धंदा केला असला तर किती कमावले असते याचा हिशोब करून त्याची एकत्रित बेरीज करा. व हा आकडा मनात ठेवा…

सत्काराचे कार्यक्रमातून वेळ मिळला तर वार्डात फेर फटका मारा.वार्डात कोणती कामे प्रलंबित आहेत याचा आढावा घ्या.त्यात कमी खर्चात व जादा बजेट मध्ये कामे काढता येईल काय ते पहा.त्याचा पाठ पुरावा पालिकेत करा…

नागरिकांची सर्व कामे एका पंचवार्षिक मध्ये करण्याचा पायंडा पाडू नका.पुढील निव्नुडकीचे सोयीने ते अहिताचे असते.लोकांना मोठ्या कामा साठी झुलवत ठेवण्याची कला अंगीकारा…

छोटी कामे त्वरित आपल्याक्डून झाली पाहिजेत या बाबतीत द्क्ष रहा.छोट्या कामामध्ये पोलीसस्टेशन.सरकारी कार्यालयातील कामे हि येतात.सुविधांची कामे जरी पूर्ण झाली नाही तरी मयत,दशक्रिया तेरावा सुखदुखात सहभाग समोरून येणारा नाग्रीकाशी बोलण्यास वेळ नसला तर स्मित हास्य करणे प्रत्येक गल्लीत आठ दिवसातून फेर फटका मारणे ख्याली खुशाली जाणणे या बाबीस मतदारांचे मत देताना प्राधान्य असते.तुमचा प्रामाणिक पणा काम करण्याची तळमळ या दुय्यम आहेत…

तुमच्या राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ……………………….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button