महाराष्ट्र

श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात श्री. नृसिंह जयंती नवरात्रोत्सव उत्साहात साजरी.

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल- 8378076123

येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात श्री नृसिंह जयंती नवरात्र उत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यात्रा काळात मंदिराला आकर्षक फुलांची व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. देवस्थान समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी चोख व्यवस्था केली होती.

दररोज नृसिंह पवमान पंचामृत महापुजा, भजन, भरनाट्यम, प्रवचन, सुगम भक्ती संगीत, बासरीवादन, भक्तीगीत, अभंग यात्रा, मुक्ताई एक आविष्कार तसेच नामवंत कलाकारांच्या वतीने भक्तीसंगीताचे कार्यक्रम संपन्न झाले. त्यामध्ये नामवंत गायिका सौ.मंजीरी कर्वे आलेगांवकर, वैद्य सौ.प्रचिती सुरू, सौ.भक्ती पागे, सानीया व रसाका कुलकर्णी, तुषार केळकर, बासरिवादक श्री.नंदकुमार डिंगरे तसेच सतार वादक पं. अतुल केसकर आशीष केसकर, किर्तनकार ह.भ.प आनंद काकडे, ह.भ.प.संध्या पाठक, ह.भ.प. स्वरदा पटवर्धन, ह.भ.प.वासुदेव बुवा बुरसे, ह.भ.प. प्रदीपचंद्र पुजारी, ह.भ.प.राघवेंद्र देशपांडे, ह.भ.प.भालचंद्र देव, नृसिंह जयंती जन्मकाळाचे किर्तन ह.भ.प. विलास गरवारे सर यांनी केले. जन्मकाळास पंचक्रोशीतून हजारो नृसिंह भक्त आले होते.

श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्टच्या वतीने दररोज अन्नदान सर्व भक्तांना करण्यात आले, यावर्षी संपुर्ण मंदिराला फुलांनी सुशोभीकरण करण्यात आले होते. तसेच देवस्थान समितीने संपुर्ण मंदिरात कापडी मंडप टाकण्यात आला होता. विद्युत रोषणाईने संपुर्ण मंदिर परिसर, शिखर, पंश्चिम दरवाजा, दोन्ही भव्य बुरूज, सभा मंडप, आतील गर्भ गाभारे लाईटने विद्युत प्रकाशात उजळून निघाले, मंदिर ते चौका पर्यत दुतर्फा विद्युत रोषणाई केली होती.

यावर्षी धाराशिव उस्मानाबाद येथील जे.एफ.अजमेरा रोटरी नेत्ररुग्णालय व देवस्थान यांचे वतीने नेत्र व दंत मोफत तपासणी शिबीर झाले. डोळे तपासणी १२० व दंत तपासणी १०० गरजू गरीबांची करण्यात आली. गावातील यात्रा कमीटीने भक्तांना जन्मकाळ सर्वांना पहाता यावा म्हणून मंदिराच्या बाहेरील बाजुस पश्चिम दरवाजा खाली स्क्रीन पडदा लावला होता. त्यामुळे सर्व भक्तांना श्रींचे दर्शंन झाले. तसेच श्रींची पालखी व छबीना मिरवणूक दारूकाम व आकर्षक विद्युत रोषणाईने भाविकांचे डोळे दिपले होते.

तसेच काल्याची किर्तन सेवा ह.भ.प. अंकुश रणखांबे महाराज यांची झाली. लक्ष्मी नृसिंह देवस्थान मुख्य विश्वस्त ज्ञानेश्वर अरगडे, विश्वस्त अभय वांकर, विश्वस्त डाॅ.प्रशांत सुरू, विश्वस्त प्रकाश सुरू, विश्वस्त प्रमोद दंडवते, पुजारी मंडळ, ग्रामपंचायत संरपच, उपसरपंच, यात्राकमीटी, ग्रामस्थ यांनी श्री नृसिंह जयंती नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी बावडा पोलीस दुरक्षेत्रचे सहकार्या लाभले.

श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात श्री नृसिंह नवरात्रोत्सव काळात हजारो भाविकांनी येवून दर्शन घेतले. परंतू इंदापूर आगाराची असणारी एकमेव एसटी बस बंद असल्याने भाविकांना खाजगी गाड्यांचा सहारा घेवून ज्यादाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. सदरच्या बाबीची गांभीर्याने दखल घेवून दोशीवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ व भाविकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button