महाराष्ट्र

गणेशवाडी येथे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल- 8378076123

छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांची पुण्यतिथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निरा भिमा कारखान्याचे संचालक हरिभाऊ घोगरे होते.

गणेशवाडी ( ता. इंदापूर ) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती राजर्षि शाहू महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ संगिता सचिन कदम, आशासेविका रफिया तांबोळी, योगेश कुंभार, रामचंद्र कुंभार, सौ. कोमल खंडागळे, श्रीमती रोहिनी घोगरे, सौ. अश्विनी योगेश कुंभार, सौ. अश्विनी रामचंद्र कुंभार, चंद्रकांत घोगरे, मुख्याध्यापिका कांचन दत्तात्रय शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रज्ञाशोध परिक्षेत यश संपादन केलेल्या इ. ४ थी कु. श्रेया योगेश कुंभार, इ. उरी. संचित रामचंद्र कुंभार, गुणवंत विद्यार्थी- ४ थी कु. श्रावणी सचिन कदम, आनंद चेतन साठे, इ. उरी कु. श्रेया अमोल खंडागळे, संचित कुंभार, इ.२री. कु. संयुक्ता सतिश खंडागळे, श्रेयश अ. खंडागळे, तर सांस्कृतीक कार्यक्रम:-भाषन व डान्स – राज लक्ष्मण साठे, सुकन्या राजेश सोनवणे, प्रणाली कृष्णा शेंडगे यांना परीक्षा पॅड व पेन बक्षीस देण्यात आले. तसेच पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना निकालाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका कांचन शिंदे यांनी, सुत्रसंचलन रफिया तांबोळी यांनी तर आभार संगिता कदम यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button