सिल्वर ओक वर शरद पवार यांच्या राजीनामाचे वादळ असताना त्यांनी सांगली जिल्ह्यातील तरुणाची मणिपूरच्या हिंसाचारातून केले सटका

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
शरद पवारकडे नेहमी फक्त राजकारण्याच्या नजरेने पाहणारांनी काल संध्याकाळी सात वाजता “सिल्व्हर ओकवर” राजीनामा चे वादळ चालु आसताना सांगली जिल्ह्यातील तरुणाची मणिपूर इंफाळ येथील हिंसाचारातुन कशाप्रकारे सुटका केली हे एकदा वाचा..
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील आवंडी गावातील संभाजी कोडग यांना काल त्यांच्या मुलाचा फोन आला. “बाबा मला वाचवा, आजुबाजुला गोळीबार आणि स्फोटाचे आवाज येतायत. कदाचीत हा माझा शेवटचा फोन असेल, काहीतरी करा.” मणिपुरची राजधानी इंफाळमधून मुलाचा असा फोन आल्यावर बापाची अवस्था काय झाली असेल? संभाजीरावांनी पहिला फोन बारामती ला आमचे मार्गदर्शक प्रल्हाद वरे काकांना लावला. मणिपुरच्या हिंसाचारात महाराष्ट्रातली आय.आय.टीचे शिक्षण घेणारी १० मुले होस्टेलवर अडकली आहेत त्यांना काहीही करून वाचवा अशी विनवणी केली. वरे काकांनी उद्या म्हणजे आज ५ तारखेला मुंबईत पवारसाहेबांना भेटायला जावू असे सांगीतले पण वेळ खुप कमी आहे हे संभाजीरावांनी जाणवून दिले आणि साहेबांपर्यंत निरोप पोहचवण्याची विनंती केली. वरे सरांनी साहेबांचे खाजगी सचिव Satish Raut सरांचा नंबर त्यांना दिला आणि तातडीने संपर्क करायला सांगीतला. सतिश सरांनी फोनवरून सगळी परीस्थीती समजून घेतली. साहेबांपर्यंत निरोप पोहचवला. घटनेचे गांभिर्य जाणून साहेबांनी तातडीने मणिपुरच्या राज्यपालांना फोन केला आणि महाराष्ट्रातील १० मुलांबरोबर दुसर्या राज्यातील त्यांच्या २ मित्रांना सुरक्षीत स्थळी हलवण्याची सुचना केली. मुलांचे लोकेशन, संपर्क क्रमांक साहेबांच्या कार्यालयाकडून पाठवले. रात्री बाराच्या दरम्यान मणिपुर मिल्र्टीच्या चिफ कमांडरांचा मयुर कोडग या विद्यार्थ्याला फोन आला आणि आमची टीम तुम्हाला संरक्षणामध्ये सुरक्षीत स्थळी पोहचवण्यासाठी थोड्याच वेळात होस्टेलवर येत आहे असा निरोप दिला. काल रात्री या १२ मुलांना लष्करी छावणीमध्ये सुरक्षीतरीत्या स्थलांतरीत करण्यात आले.

पवार साहेबांच्या राजीनाम्याचे वादळ सुरू असताना सिल्व्हर ओकवरून या मुलांच्या सुटकेचे काम सुरू होते. रशिया-युक्रेन युद्धातही अशीच मदत भारतीय मुलांना साहेबांच्या समन्वयाने झाली होती. सत्ताकेंद्र हे नावापुढच्या पदव्यांनी तयार होत नाही त्यासाठी स्वतःच्या नावाची विश्वासार्हता तयार करावी लागते. अशा हजारो मदती साहेबांनी या हाताच्या त्या हाताला वेळी निर्णायक सहकार्य करते.



