पुरूषोत्तम मुसळे यांना डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार.

भोर प्रतिनिधि दत्तात्रय बांदल
पत्रकारीतेमध्ये चार दशकाहून अधिक काळ सेवा केल्याबद्दल पत्रकार संघ भोरचे अध्यक्ष जेष्ट पत्रकार पुरूषोत्तम मुसळे यांना पद्मश्री डॉ मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्काराने सन्मानीत केले आहे.सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.नीती आयोग भारत सरकार,मॅगसेसे पुरस्कार प्राप्त पद्मश्री डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठानच्या वतीने विवीध क्षेत्रात निस्पृहपणे योगदान देउन उल्लेखनिय काम करणा-या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
मुसळे यांनी भोर,वेल्हे तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक,राजकीय,सांस्कृतिक,ऐतिहासिक, पर्यावरण आदी क्षेत्रातील विविध कार्यक्रम, घडामोडी, घटनांचे परखडपणे वार्तांकन केले आहे. त्याची दखल घेउन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येथे संस्थेचे अध्यक्ष डॉ रविंद्र भोळे,डॉ अशोक के पाटील,सुभाष कटयारमल आदींच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले.या पूर्वी मुसळे यांना विविध संस्था,संघटनांच्या वतीने तालुका,जिल्हा व राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत.



