क्रीडा

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील वाढदिवसानिमित्त आयोजित ताराराणी महिला कुस्ती स्पर्धेसाठी सिनेतारकासह दिग्गज नेते उपस्थित राहणार—- शितल देवी मोहिते पाटील

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

आमदार .रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात प्रथमच दि.5,6,7 मे रोजी होणाऱ्या ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेच्या तयारीची पाहणी भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री.धैर्यशिल मोहिते-पाटील व ताराराणी महिला कुस्ती केंद्राच्या संयोजिका शितलदेवी मोहिते-पाटील यांनी केली.

स्पर्धेची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. या स्पर्धा विजयसिंह मोहीते पाटील क्रीङा संकूल, अकलूज येथे होणार आहेत.

२५ हजार प्रेक्षकांची बैठक व्यवस्था

कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी येणा-या कुस्ती शौकीन प्रेक्षकांसाठी क्रीङा संकुलावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. महीलांसाठी व पुरुषांसाठी वेगवेगळी बैठक व्यवस्था करण्यात आली असून सुमारे २५ हजार प्रेक्षक एकाच वेळी स्पर्धेचा आनंद घेऊ शकतील. स्पर्धे दरम्यान मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

९०० स्पर्धकांनी केली नाव नोंदणी

हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटकसह देशातील इतर राज्यांतून सुमारे १५० महीला मल्लांनी या स्पर्धेत खेळण्यासाठी आपली नावे संयोजन समितीला कळवली आहेत. या १५० स्पर्धकांसह महाराष्ट्रातील नाव नोंदणी केलेल्या स्पर्धकांची संख्या ९०० झाली आहे. यामध्ये राष्ट्रीय स्पर्धा खेळलेल्या खेळाङुंचाही समावेश आहे. परराज्यातील मल्लांना प्रवास खर्च देण्यात येणार आहे. त्यांच्या राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.

सिने तारकांसह दिग्गज नेतेही येणार स्पर्धे दरम्यान सिने विश्वातील कलावंत व राज्याच्या राजकारणातील दिग्गज मंङळी स्पर्धा पाहण्यासाठी हजर राहणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन माजी उपमुख्यमंञी विजयसिंह मोहीते पाटील करणार असून यावेळी नटरंग सिनेमातील अभिनेञी सोनाली कुलकर्णी उपस्थित राहणार आहे. स्पर्धेपुर्वीच अनेक सिने व नाट्य कलावंतांनी सोशल मिङीयाच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मॕट वरती होणार कुस्त्यांचा थरार

एकाच वेळी तीन मॕट मैदानांवर सकाळी आणी सायंकाळी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. मैदानाची साईज १२० फुट बाय ५० फुट इतकी भव्य आहे. जिंकणा-या व हारणा-या मल्लांना पहील्या फेरीपासून रोख बक्षिसे व मेङल्स देण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button