महाराष्ट्र

नेतृत्व अभावी दिशाहिन झालेली काँग्रेस…

काँग्रेस सह देशाला गरज आहे ती एका नव्या गांधीची आणि गांधीवादाची…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

काँग्रेस हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे.काँग्रेस ची स्थापना २८ डिसेंबर,१८८५ रोजी “एलेन ओक्टेवियन ह्यूम,दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा” यांनी केली.मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधीनी एकत्र येऊन २८ डिसेंबर १८८५ रोजी ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली होती…

पूर्वनियोजित राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन २२ डिसेंबर १८८५ पुणे या ठिकाणी घेतले जाणार होते.मात्र पुण्यात कॉलराची साथ सुरू असल्यामुळे हे अधिवेशन मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत घेतले गेले.राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कलकत्त्याचे ख्यातनाम वकील व्योमेशचन्द्र बॅनर्जी हे होते…

राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सरकार व जनता यांच्यामध्ये एक संवादात्मक स्वरूपाची वाटचाल सुरू झाली.काँग्रेसचा अर्थ “संघटना” असा होतो.सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसचे नेतृत्व हे मवाळ गटाकडे होतं…

पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत काँग्रेसचे नेतृत्व जहाल गटाकडे होतं (लोकमान्य टिळक,नेताजी सुभाषचंद्र बोस,गोपाळ गणेश आगरकर) त्यानंतर मात्र १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे नेतृत्व हे महात्मा गांधींनी केलं…

‘महात्मा गांधी म्हणजे एका माणसाचे सैन्य’ असे गौरवोद्गार त्यांच्यासंदर्भात माऊटबॅटन यांनी काढले होते.१९व्या शतकाच्याच्या शेवटी आणि २०व्या शतकाच्या मध्यपर्यंत,काँग्रेस भारताचा स्वातंत्र्यलढ्यात,आपल्या १.५ कोटी पासून जास्त सदस्य आणि ७ कोटी पासून जास्त सहभागींसोबत,ब्रिटिश वसाहती शासनाच्या विरोधात एक केंद्रीय भागीदार बनली…

आजही काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह भारतामध्ये आहे.गांधी आणि नेहरू घराण्याची परंपरा लाभलेल्या काँग्रेस पक्षाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर देखील देशाच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे.महत्त्वाच्या राष्ट्रीय पक्षांमध्ये काँग्रेस पक्षाचे स्थान कायम आहे…

मधल्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला अनेक स्थित्यंतरातून जावे लागले.देशातील अंतर्गत घडामोडी,स्थित्यंतरे,पक्ष राजकारण या समस्यांना तोंड देत भ्रष्टाचार बेरोजगारी अशा अनेक समस्या सरकार समोर होत्या.आर्थिक मंदी यासारख्या समस्यांना तोंड देत सत्तेवर असताना काँग्रेस पक्षाने देशाच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत…

कृषीक्षेत्रऔद्योगिकक्षेत्र,संशोधन यासारख्या घटकां सह संगणक प्रणालीला काँग्रेस ने प्राधान्यक्रम दिला.काँग्रेस संघटनाच्या माध्यमातून पक्षाचे सर्व ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी केलं,धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या आधारे संपूर्ण देशाच्या विकासाचा आराखडा काँग्रेस सरकारने तयार केला…

काँग्रेसच्या पक्षीय राजकारणामध्ये नेहरू आणि गांधी घराण्याचे योगदान हमेशाच महत्त्वपूर्ण राहिलेला आहे,परंतु तीच काँग्रेस आज दिशाहीन झाली असुन या मुळे “गांधी” आणि “गांधी वादी” यांची ओळख पुसट होऊ लागली आहे…

एवढ्या वर्षात याच काँग्रेस ने अनेक नेते या देशाला दिले परंतु काहीं जणांनी काँग्रेसशी बेइमानी करत आपली चूल वेगळी मांडली,या मध्ये काहीं जण यशस्वी झाले तर काहीं जण कैलासवासी आणि पैगंबर वासी सुध्दा झाले…

आज देशा मध्ये प्रादेशिक पक्षाचे जे उधाण आलेले आहे ते काहीं प्रमाणात याच काँग्रेसचे एके काळी चेहरे होते असे म्हटल्यास वावगे ठरू नये,तरी सुध्दा काँग्रेस इतक्या वेळी तुटून आणि फुटून शाबुत राहिली आहे…

गेल्या काही वर्षांत काँग्रेसची झालेली जी अवस्था आहे त्यास पूर्णतः स्वतः काँग्रेसच जबाबदार आहे कारण गांधी आणि नेहरू घराणे सोडले तर याच काँग्रेसचे अनेक नेत्यांनी अक्षरशः लचके तोडले असुन सध्याच्या घडीला हिच काँग्रेस नेतृत्व हीन झालेली दिसत आहे…

आज काँग्रेस ला खरी गरज आहे ती एका नव नेतृत्वाची आणि नव्या विचारांची,देश अजूनही एका नव युगातल्या “गांधी” ची आतुरतेने वाट पाहत आहे,कारण देशाला आता एका नव्या गांधी सह नव्या गांधी वादाची गरज आहे,असे मला तरी वाटते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button