शैक्षणिक

श्रेया अकॅडमी लातूरच्या राज्यस्तरीय इंटेलिजंट अकॅडमी सर्च परीक्षेत काव्य निलेश देशमुख राज्यात प्रथम

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

श्रेया अ‍ॅकॅडमी लातुर च्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय इंटेलिजंट अ‍ॅकॅडमी सर्च परीक्षेत कुर्डवाडी येथील आदर्श पब्लिक स्कूल, मधील इयत्ता तिसरीची विद्यार्थीनी काव्या निलेश देशमुख हिने ३०० पैकी २९४ गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिला शिक्षिका सुरेखा कांबळे, यशोदिप क्लासेसचे तानाजी खरात, आई सोनाली देशमुख, वडील निलेश देशमुख हिचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल तिचे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश बागल, गटशिक्षणाधिकारी बंडू शिंदे,महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी आनंद जाधव, केंद्रप्रमुख सिमिंता कुंभार,आदर्श पब्लिक स्कूलचे संस्थापक-अध्यक्ष अमोल सुरवसे,संचालिका पुजा सुरवसे,यशराज उद्योग समूहाचे अध्यक्ष गोरख खटके-पाटील,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटिल, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, मराठा सेवा संघाचे माढा तालुका उपाध्यक्ष अरूण जगताप, कार्याध्यक्ष शिवाजी गवळी,शहराध्यक्ष सचिन महिंगडे, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष निताताई खटके,तांबवेचे तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नागनाथ खटके, माजी सरपंच राजाभाऊ खटके, मुख्याध्यापक बाळासाहेब देशमुख,तडवळे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ परबत, मनसेचे सुभाष खटके,डॉ.बालाजी शिंदे,डॉ.संग्राम परबत, स्वप्नील केमदारणे, पत्रकार महेश देशमुख, विकास अभिमान खटके, जुनी पेन्शन संघटनेचे कमलाकर दावणे, शिवानंद बारबोले, दिनेश उरमोडे यांनी अभिनंदन केले.
“काव्या देशमुख “हिच्या यशाबद्दल टाइम्स नाईन मराठी न्यूज नेटवर्क परिवाराच्यावतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button