शहर

राहुर ग्रामपंचायत सरपंच पदी राजनंदनी काचेवाड तर उपसरपंच पदी शिवाजी गोपणवाड यांची बिनविरोध निवड.सरपंच पदी भाची तर उपसरपंच पदी मामा विराजमान

प्रतिनिधी मायाताई सागर पाईकराव यवतमाळ

महागाव तालुक्यातील विदर्भ मराठवाडा सिमेवर वसलेल्या राहुर या गावची ग्राम पंचायत निवडणूक ही अडीच वर्षांपूर्वी १५ जानेवारी २०२१ ला झाली होती. या मध्ये परिवर्तन प्यानलचे 9 सदस्य निवडुन आले होते तर राजु दत्ता कदम यांची सरपंच पदी तर सौ.प्रतिमा अनिलकोरेवाड यांची उपसरपंच पदी अडीच वर्षा करीता निवड करण्यात आली होती.

यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ २४ अगस्ट २०२३ ला पुर्णत्वास आला असल्याने,सरपंच व उपसरपंच पदाची पुनर निवड आज दि.१० ऑक्टोंबर रोजी निवड निर्णय अधिकारी कृषी पर्यवेक्षक व्हि बी पवार यांच्या उपस्थितीत पार पडली असून सरपंच पदी सौ.राजनंदनी शिवाजी काचेवाड व उपसरपंच पदी शिवाजी रामचंद्र गोपणवाड यांची वर्णी लागली आहे.

या निवडीसाठी सरपंच पदाकरिता एक अर्ज व उपसरपंच पदासाठी एक अर्ज आला होता.तर तिसरा अर्ज दिलिप गोविंद जाधव यांनी सही करुन नेला होता परंतु तो अर्ज परत केला असल्याने ही निवड बिनविरोध झाली आहे.

सरपंच व उपसरपंच पदाच्या निवड प्रक्रियेची वेळ ही दुपारी दोन वाजता होती.ही निवड प्रक्रिया करते वेळी एकुण ९ सदस्या पैकी सौ.राजनंदनी शिवाजी काचेवाड,शिवाजी रामचंद्र गोपणवाड,राजु दत्ता कदम,प्रतिमा अनिल कोरेवाड,सुनिता नवनित आखरे हे सदस्य उपस्थित होते.तर दिलिप गोविंद जाधव,सौ.कविता शिवाजी काळे,शब्बानाबी शेख,सौ.सिमा प्रमोद नेवरे हे ४ सदस्य अनुपस्थित होते. यामुळे हि निवड बिनविरोध झाली.या मामा भाचीच्या निवडीस सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

यावेळी माजी सैनिक रामचंद्र मारोती आखरे,नारायण राघोजी इर्लेवाड,लक्ष्मण नारायण माणिकवाड प्रदिप सूर्यभान पोवरवाड,अंकुश श्रीराम चव्हाण,गजानन दत्तराव कदम,अभिजीत आनंदराव जामगडे,ऑपरेटर अजय अशोक पवार, रोजगार सेवक मोहन दिपक चटलेवाड,पाणीपुरवठा कर्मचारी संतोष प्रल्हाद बळवंते ग्रामपंचायत सचिव डि एस सरदार सह गावातील प्रतिष्ठीत नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसुन आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button