महाराष्ट्र

प्राध्यापक एस एम बागवान यांना पीएचडी प्रदान…

🎯 बागवान समाजातील पहिलेच पी एच डी धारक ठरल्याने सर्वत्र कौतुक…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथील शास्त्र विभागातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक शकील मुबारकभाई बागवान यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचे कडून पीएचडी प्रदान करण्यात आली…

प्रा एस एम बागवान यांनी अमेरिकन लेखक निल स्टीफनसन यांच्या साहित्याचा अभ्यास करून आजच्या प्रगत सायन्स आणि तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर होणारा दुष्परिणाम या संदर्भात संशोधन करून आपली पीएचडी पूर्ण केली…

प्रा एस एम बागवान यांना मार्गदर्शक म्हणून बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेज,बार्शी येथील प्राचार्य डॉक्टर संजय करंडे यांचे मार्गदर्शन लाभले.प्रा एस एम बागवान यांना पीएचडी ने सन्मानित करण्यात आल्याने समाजातील विविध स्तरातून त्यांचा सत्कार करण्यात आला…

तसेच शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथील समन्वयक डॉ दिलीप घायतिडक व इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.प्रा एस एम बागवान यांचे मूळ गाव मोहोळ असून ते बागवान समाजातील पहिलेच पीएचडी धारक असल्याने महाराष्ट्र बागवान जमीयत संघटना आणि “बागवान राहत फाऊंडेशन” महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देखील त्यांचे अभिनंदन करण्यात आले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button