डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची जयंती साजरी करा- दत्तात्रय मामा भरणे

इंदापूर तालुका—प्रतिनिधी –
मोहम्मद कैफ तांबोळी
मो. 8378 081 147
बेलवाडी येथे गावच्या इतिहासात प्रथमच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महापुरुषांच्या विचारांचा जागर.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती व “मी आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेचा ५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

डिजे न लावता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती साजरी करा….- दत्तात्रय भरणे.
शनिवार दि. २९ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी बेलवाडी येथे पालखी मैदानावर मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा जयंती महोत्सव व संघटनेचा व तेथील शाखेचा ५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम तथागत गौतम बुद्ध व सर्वं महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून व बुध्द वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी आंबेडकरवादी चळवळीतील योगदानाबद्दल वैभव गिते यांचा सत्कार ठेवण्यात आला तर शेवटी विजय सरतापे यांचा भिमबुध्द गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम व स्नेहभोजन ठेवण्यात आले होते.त्याचप्रमाणे आलेल्या प्रमुख मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करून विचारांची जयंती साजरी करण्यावर भर दिला.

या कार्यक्रमाला इंदापूर तालुक्याचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,वालचंदनगर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे,नेचर डिलाईट चे डायरेक्टर डॉ. ज्योतिराम देसाई,बेलवाडी च्या सरपंच सौ.मयुरी जामदार, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभवजी गिते, “मी आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज वनसाळे,पॅंथरचे जेष्ठ नेते दादासाहेब धांडोरे,साहित्यिक व पॅंथर सु.ग.साबळे, ॲड. शरद जामदार, ॲड.शुभम निंबाळकर,ग्रामपंचायत सदस्य अनिल खैरे, ग्रामपंचायत सदस्य अशोक जामदार, संघटनेचे सचिव अनिल केंगार, संपर्क प्रमुख नागेश भोसले, दत्तात्रय राक्षे, पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड, लासुर्णे चे ग्रामपंचायत सदस्य संतोष (पिपा)लोंढे पत्रकार लक्ष्मण भिसे, पत्रकार अनिल कदम, वालचंदनगर चे युवा कार्यकर्ते गणेश धांडोरे, सुमित घोडके, सौरभ धनवडे, बौध्दाचार्य आनंद फरतडे,बेलवाडी चे बीट अंमलदार खाडे,महाराष्ट्राचे लाडके गायक विजयदादा सरतापे, चंद्रकांत लांडगे,हे उपस्थित होते.
यावेळी अनिल केंगार यांनी प्रास्ताविक केले तर आभारप्रदर्शन ॲड शुभम निंबाळकर यांनी केला. सुत्रसंचालन राऊत सर यांनी केले.हा कार्यक्रम “मी आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेच्या बेलवाडी शाखेच्या अनिता कांबळे, शिल्पा चव्हाण, रूक्मिणी चव्हाण, योगिता भोसले,सविता राक्षे, सौ.मिरा थोरात , परमेश्वर कांबळे , विठ्ठल चव्हाण, सुरज चव्हाण, रघुनाथ चव्हाण व असंख्य स्थानिक कार्यकर्ते यांनी प्रयत्न केला.



