शहर
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने पुरूषांना सुधारक सन्मान पुरस्कार

माळीनगर प्रतिनिधी
रियाज मुलाणी 9921500780
महिला आर्थिक विकास महामंडळ, जि. कार्यालय सोलापूर , नवतेजस्विनी ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र, यशवंतनगर अंतर्गत समाजात स्त्रियांना संमानतेने वागवणारे व माणूस म्हणून अधिकार जपणाऱ्या पुरुषांचा "सुधारक सन्मान पुरस्कार "
(Men Gender Sensitive Role Model Award” )पुरस्कार कार्यक्रम गावस्तरावर ग्रामसंघ निहाय एका पुरुषांना असे १९ पुरस्कार अप्पर तहसीलदार अजिंक्य गोडगे , गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस विनायक गुळवे , सहाय्यक गटविकास अधिकारी किरण मोरे , पोलीस हवालदार बोंद्रे , तालुका कार्यक्रम व्यवस्थापक रणजीत शेंडे, व सीएमआरसी अध्यक्ष कौसर शेख, शीला गायकवाड ,वैशाली कांबळे , जयश्री एकतपूरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन सीएमआरसी व्यवस्थापक तनुजा पाटील यांनी केले
यावेळी अप्पर तहसीलदार अजिंक्य गोडगे, गटविकास अधिकारी विनायक गुळवे , तालुका कार्यक्रम व्यवस्थापक रणजीत शेंडे मार्गदर्शन केले. राजेश कांबळे व अरुण खंडागळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजीविका सल्लागार संग्राम बनकर , सीएमआरसी लेखापाल सविता क्षीरसागर, संदीप एकतपुरे क्षेत्रसमन्वयक रिजवाना शेख, वैशाली शिंदे व सर्व सीआरपी कार्यकारणी यांनी परिश्रम घेतले व आभार कार्यकारणी जयश्री एकतपुरे यांनी मानले.



