शहर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संचालक पदी डाॕ.राजेंद्र वडजे यांची निवड

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

सोलापूर येथील A.R. बुर्ला महिला महाविद्यालय सोलापूर येथील प्रा. डॉ. राजेंद्र वडजे यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ च्या एन.एस.एस. विभागाच्या संचालक पदी निवड झाली. सर A.R.बुर्ला महाविद्यालय येथे कला शाखेत हिंदी या विषयावर शिकवत होते. त्यांचा एन.एस.एस आणि एकंदरित सामाजिक कार्य या सर्व गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. यावेळी एन.एस.एस चे दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय आणि डी. ए. व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालय सोलापूर यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी एन.एस.एस. चे माजी स्वयंसेवक विशाल चव्हाण, हणमंत सलगर , महेश बजरंग कोळेकर, सागर राठोड, आदी एन.एस.एस. स्वयंसेवक आणि एन.एस.एस स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांना दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या आणि डी. ए. व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालय सोलापूर च्या एन. एस. एस. विभाग कडून आणि सर्व स्वयंसेवक यांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. आतापर्यंत आपल्या भारत देशात जेव्हाजेव्हा नैसर्गिक आपत्ती आलेली आहे त्या त्या वेळी एन. एस.एस स्वयंसेवक आणि एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी हे धावून आलेले आहेत. याच एन.एस.एस. विभागाला बळकटी मिळावी हीच अपेक्षा सर्वांनी या दरम्यान व्यक्त केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button