शहर

500 रुपयांच्या स्टॅम्प बाबत सोलापूर जिल्ह्याला सापत्न वागणूक? की जिल्हा मुद्राँक व कोषागार अधिकाऱ्याच्या दुर्लक्ष पणामुळे स्टॅम्पचा तुटवडा

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात तसेच माळशिरस तालुक्यात मागील दोन महिन्यापासून 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा जाणवत असून सर्वसामान्य व इतर नागरिकांना याचा फटका बसत असून त्रासही सहन करावा लागत आहे एखाद्या नागरिकांचा खरेदी विक्रीचा व्यवहार मोठा असेल आणि जर त्याकरिता 8 ते 10 हजार रुपयांचा स्टॅम्प लागत असेल तर 500 रुपयांच्या स्टॅम्प अभावी त्या नागरिकांना शंभर रुपयाचे 80 ते 100 स्टॅम्प त्या व्यवहारासाठी जोडावे लागत आहेत

त्यामुळे नागरिक तर त्रस्त होत आहेच त्याचबरोबर स्टॕम्प व्हेंडरला आणि लेखनिकला याचा त्रास होत आहे तो म्हणजे केवळ आणि केवळ जिल्हा कोषागार तालुका उपोषाकार यांच्या हलगर्जीपणामुळे हे सर्व घडत आहे या संदर्भात माळशिरस येथील उपकोषागार कदम यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून माहिती घेतली असता ते म्हणाले की याबाबत आमच्या हातात काही नाही मुंबई येथून प्रत्येक जिल्ह्याला स्टॅम्प वितरण होत असतात तेथेच स्टॅम्प उपलब्ध नाहीत त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला स्टॅम्पचा तुटवडा जाणवत आहे

या संदर्भात माळशिरस उपकोषागार कदम यांच्या शी अधिक संवाद साधला असता ते म्हणाले की संपूर्ण राज्याला मुंबई येथून नंबर प्रमाणे स्टॅम्प उपलब्ध होत असतात आणि ज्यावेळी सोलापूर जिल्ह्याचा नंबर आला आणि स्टॅम्प संपले तर नंतर जेव्हा सोलापूर जिल्ह्याचा नंबर येईल त्यावेळी स्टॅम्प उपलब्ध होतात शिवाय सोलापूर जिल्ह्यासाठी पुढील मे महिन्यात नंबर येणार आसल्याचे सांगण्यात आले तसेच या संदर्भात महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात माहिती घेतली असता सर्व जिल्ह्यात 500 रुपयांचे स्टॅम्प उपलब्ध आहेत तर सोलापूर जिल्ह्याला का नाही हा संशोधनाचा प्रश्न असून सोलापूर जिल्ह्याला याबाबत सापत्न वागणूक मिळत असल्याचे बोलले जात आहे

सोलापूर जिल्हा कोषागार हे प्रभारी असून त्यांच्याकडे इतर विभागाचा अधिभार असल्याने त्या जिल्हा मुद्रांक अधिकारी व कोषागार आधिकारी यांचे याकडे साफ दुर्लक्ष होत असून कोषागार विभागातून त्यांना हे विभाग मलाईदार नसल्याने दुर्लक्ष होत आहे का ?असेही नागरिकातून बोलले जात आहे या संदर्भात जिल्हा कोषागार मोमीन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की आम्ही मागणी केली असून वरूनच तुटवडा असल्याचे त्यांनी सांगितले शिवाय ट्रेझरीकडे केवळ स्टॅम्प ठेवायचे असतात वितरणचे काम जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्याकडे असते तरी मागील दोन महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यात 500 रुपयांच्या स्टॅम्प चा होत असलेला तुटवडा दूर करून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे

तरी शासकीय स्तरावरून याची चौकशी होऊन दोषीअधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी शिवाय सोलापूर जिल्ह्याला सापत्न वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी होऊन त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होत असुन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे याकडे लक्ष देतील का?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button